Sat, Jul 04, 2020 15:21होमपेज › International › आणखी एका विषाणूचे भय, एपोकॅलिप्टिक विषाणू कोरोनापेक्षाही धोकादायक?  

आणखी एका विषाणूचे भय, एपोकॅलिप्टिक विषाणू कोरोनापेक्षाही धोकादायक?  

Last Updated: Jun 02 2020 10:00AM

संग्रहित छायाचित्रनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

कोरोनाच्या संकट संपण्याचे नाव घेत नाही तोच आणखी एका विषाणूचे भय निर्माण झाले आहे. मोठ्या प्रमाणावरील चिकनचे उत्पादन थांबवणे खूपच गरजेचे आहे. ज्याप्रकारे मोठ्या प्रमाणावर चिकनचे उत्पादन होत आहे, ते एक धोकादायक महामारीचे कारण बनू शकते. ही महामारी कोरोनापेक्षा अधिक जीवघेणी आणि घातक असेल, असा दावा ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञ मायकल ग्रेगर यांनी केला आहे. या दाव्याला डब्ल्युएचओने किंवा तत्सम सरकारी आरोग्य यंत्रणेने अजून दुजोरा दिलेली नाही.  

ऑस्ट्रेलियाचे हेल्थ एक्सपर्ट आणि शास्त्रज्ञ डॉक्टर मायकल ग्रेगर यांनी लोकांना जागृत करत म्हटले की, 'चिकनचे मोठ्या प्रमाणावरील उत्पादन रोखणे खूप गरजेचे आहे. डॉक्टर ग्रेगर यांच्यानुसार, चिकन फर्ममध्ये आढळून आलेला विषाणू 'एपोकॅलिप्टिक' इतका घातक असेल की तो, जगाची निम्मी लोकसंख्या संपवू शकतो.' 

एका ऑस्ट्रेलियन न्यूज साईटच्या माहितीनुसार, डॉक्टर ग्रेगर यांचे म्हणणे आहे की, पोल्ट्री फर्म्स (कुक्कुटपालन) मधील रोग मानवासाठी कोरोनापेक्षा अधिक घातक असेल. जगातील फूड हॅबिटविषयी आणि भविष्यात या कारणाने उद्भवणाऱ्या समस्यांविषयी आपले पुस्तक 'हाऊ टू सर्व्हाइव्ह ए पँडेमिक'मध्ये डॉक्टर ग्रेगर यांनी लिहिलंय की, 'ज्या प्रकारे जगातील लोकसंख्येचा मोठा भाग मांसाहारावर अवलंबून आहेत, ते पाहता आपण जगाला कोविड-१९ पेक्षाही अधिक घातक विषाणूच्या खाईत ढकलत आहोत.' 

ग्रेगर म्हणतात की, ''जर असेच होत राहिले तर येणाऱ्या काळात कोरोनापेक्षाही मोठी महामारी येऊ शकते. त्यामुळे पोल्ट्री फर्म्समधील चिकनचे मोठ्या प्रमाणावरील उत्पादन थांबवणे गरजेचे आहे. ही महामारी 'एपोकॅलिप्टिक विषाणू'च्या कारणाने पसरेल.'' 

आपल्या पुस्तकात ग्रेगर यांनी लिहिले आहे की, 'येणाऱ्या काळात संभाव्य महामारीपासून वाचण्यासाठी आपल्याला शाकाहार आणि वेगॉन डायट स्वीकारायला हवे. त्याचबरोबर, चिकनच्या उत्पादन पध्दती अधिक चांगल्या प्रकारे व्हायला हव्या.  कारण ज्याप्रकारे चिकनचे उत्पादन केले जात आहे, हे वातावरण जीवघेणा विषाणूचा फैलाव होण्यासाठी पोषक आहे.'