ट्रम्प यांना मधलं बोट दाखवणाऱ्या महिलेने जिंकली निवडणूक 

Last Updated: Nov 08 2019 1:45AM
Responsive image


पुढारी ऑनलाईन डेस्क 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्या देशात अनेकदा टोकाच्या विरोधाला सामोरे जावे लागले आहे. विशेषतः अमेरिकेतील बहुतांश महिलांमध्ये ट्रम्प यांच्याविरोधात रोष दिसून येतो आणि या विराधाच्या बातम्याही जागतिक पातळीवर गाजतातही. ट्रम्प यांना असाच विरोध एका महिलेने 2017 मध्ये केला होता. आज ती महिला व्हर्जिनियामधील स्थानिक निवडणूक जिंकली आहे. या 52 वर्षीय महिलेचे नाव आहे ज्युली ब्रिस्कमन. 

ट्रम्प यांनी 2016-17 मध्ये राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांच्या विरोधात डेमॉक्रेटिक पक्षाकडून हिलरी क्लिंटन उभ्या होत्या. अमेरिकेच्या इतिहासातील पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याची त्यांना संधी होती. त्यामुळे अमेरिकेतील महिलांचाही त्यांना पाठिंबा होता. याचबरोबर ट्रम्प यांच्या रंगेलपणाच्या चर्चा अमेरिकेत चर्चिल्या जात होत्या. यामुळेच कदाचीत महिला वर्गाचा ट्रम्प यांच्या विरोधात असाव्यात. 

असाच विरोध 2017 मध्ये ज्युली ब्रिस्कमन यांनी केला होता. त्या ज्यावेळी सायकलवरुन जात होत्या त्यावेळी त्यांच्या जवळून डोनाल्ड ट्रम्प यांच्या गाड्यांचा ताफा जात होता. त्यावेळी त्यांनी मधले बोट दाखवले होते. त्यावेळी हा फोटो चांगलाच व्हायरल झाला होता. पण, या व्हायरल फोटोचा फटका त्यांना बसला. त्या ज्या कंपनीत काम करत होत्या त्या कंपनीने त्यांना मर्केटिंग अॅनेलिस्ट पदावरुन काढून टाकले होते. 

पण, ज्युली ब्रिस्कमन यांनी लौडौन कंट्री बोर्ड मधील निरिक्षक पदाची निवडणूक जिंकून राजकारणात प्रवेश केला आहे. याची माहिती त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंट वरुन दिली. तसेच लौडौनवासियांचे आभारही मानले. यावेळी त्या ट्रम्प यांना मधले बोट दाखवल्याच्या बातमीची पोस्टही शेअल करायला विसरल्या नाहीत. 

आधी अनुराग ठाकूर बोलले नंतर अधीर रंजन चौधरी यांनी केली कडी! पीएम केअर्सवरुन लोकसभेत राडेबाजी


सातारा : पोलिस हॉस्‍पिटलमधून दोघांना डिस्‍चार्ज 


जळगाव : कांदा निर्यात बंदी विरोधात राष्‍ट्रवादीचा मोर्चा


वाशिम : मृत कोरोना रुग्ण महिलेच्या अंगावरील दागिने पसार!


सनी लिओनीचा कंगना राणावतला टोला!


जळगाव : बोदवड स्टेट बँकेतून साडेआठ लाखांची रोकड लंपास


जळगाव : चिनावलच्या सुपुत्राने आंतरराष्‍ट्रीय परिषदेत पाकचा बुरखा फाडला


पुणे : 'त्यानंतर'च जमावबंदी आदेश लागू करण्याचा निर्णय घ्या; अजित पवारांनी केली सूचना


मंत्री, खासदारांच्या वेतन कपातीला राज्यसभेत मंजूरी


वाशिम : अल्पवयीन मुलीचा विनयभंग