Fri, May 07, 2021 18:52होमपेज › International › ऑस्ट्रेलियन संसदेत योग दिवस साजरा  

ऑस्ट्रेलियन संसदेत योग दिवस साजरा  

Published On: Jun 18 2018 5:53PM | Last Updated: Jun 18 2018 5:53PMकॅनबेरा : पुढारी ऑनलाईन

आंतरराष्ट्रीय योग दिवस तीन दिवसांवर येऊन पोहोचला असतानाच आज ऑस्ट्रेलियन संसदेमध्ये मोठ्या उत्साहाने योग दिवस साजरा करण्यात आला. या विशेष योगा सेशनसाठी ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अबॉट उपस्थित होते. अबॉट यांनी यावेळी विविध आसने करून उपस्थित भारतीय वंशाच्या ऑस्ट्रेलियनांची मने जिंकली. यावेळी ५० भारतीय ऑस्ट्रेलियन उपस्थित होते.

ऑस्ट्रेलियन संसदेमध्ये दोन तासांचा योग सेशन मेलबर्नस्थित वासुदेवा क्रिया योगा ग्रुपकडून संसदेच्या कम्युनिटी हॉलमध्ये आयोजित करण्यात आला. आम्ही ऑस्ट्रेलियन ससंदेमध्ये योगा शिकत आहोत हे अतिशय सुखावह आहे, अशा शब्दामध्ये अबॉट यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.  भारतीय वंशाचे ऑस्ट्रेलियन योगाा प्रसार करत आहेत हे खुपच प्रशंसनीय आहे, त्यामुळे ऑस्ट्रेलियन लोकांची योगामध्ये रुची वाढत आहे हे विशेष आहे असे त्यांनी नमूद केले. 

वासुदेवा क्रिया योगाचे संस्थापक राजेंद्र येंकान्नामुळे यांनी जगामध्ये पहिल्यांदाच संसदेमध्ये योगा सेशन साजरा झाल्याचा दावा केला. आगामी काळामध्ये अशाच पद्धतीने आम्ही योगाचे कार्यक्रम करणार असल्याचे ते म्हणाले. येत्या २१ जूनला म्हणजे चौथ्या जागतिक योग दिनी व्हिक्टोरिया संसदेमध्ये अशाच पद्धतीने कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे ही राजेंद्र यांनी सांगितले. यावेळी बहु सांस्कृतिक मंत्री ॲलन टुजे, सिनेटर जेम्स पॅटेरसन, यांच्यासह ऑस्ट्रेलियातील भारतीय उच्चायुक्त ए. एम.गोंदाणे उपस्थित होते.