Wed, Jan 20, 2021 21:21'बाहुबली' बायकोची करामत! नवऱ्याचे हात बांधून, पिंजऱ्यात घालून 'डायरेक्ट' नदीत फेकले!

Last Updated: Nov 27 2020 12:35PM

प्रतिकात्मक छायाचित्रबीजिंग : पुढारी ऑनलाईन 

पत्नीमधील रुद्रावतार कधी जागा होईल हे सांगता येत नाही. अशीच एक घटना चीनमध्ये घडली आहे. तेथील एका महिलेने आपल्या पतीचे हात बांधले आणि मग त्याला नदीत फेकले.एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना Maoming शहरातील आहे. तिचा पती तिच्यासोबत चीटिंग करत होता. जेव्हा या व्यक्तीच्या अफेअरबद्दल पत्नीला समजले तेव्हा तिचा संताप अनावर झाला आणि सर्वात आधी तिने आपल्या पतीला पिंजऱ्यात कैद केले. चीनच्या सोशल मीडियावर याचा व्हिडिओदेखील व्हायरल होत असल्याचे म्हटले जात आहे. 

दोघांना रंगेहात पकडलं 

खरंतरं, या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती अर्धवट कपडे घातलेला व्यक्ती दिसत आहे. पत्नीने आपल्या पतीला दुसऱ्या महिलेसोबत पकडलं होतं. पत्नीसोबत काही लोकदेखील होते. यावेळी त्या लोकांनी पतीचे हात बांधले आणि त्याला पिंजऱ्यात घातलं. 

थेट नदीत फेकलं

पत्नीने पतीला पिंजऱ्यासह नदीत फेकलं. परंतु, काही लोकांनी त्याला पिंजऱ्यातून बाहेर काढलं. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार लोकांना ताब्यात घेतलं.