Sun, Oct 25, 2020 07:15होमपेज › International › कोरोनाचं मूळ शोधण्यासाठी डब्‍ल्‍यूएचओ चीनमध्ये जाणार!

कोरोनाचं मूळ शोधण्यासाठी डब्‍ल्‍यूएचओ चीनमध्ये जाणार!

Last Updated: Jul 04 2020 4:22PM
नवी दिल्‍ली :  पुढारी ऑनलाईन

जगभरात कोरोना विषाणूचा हाहाकार सुरूचं आहे. कोरोनाबाधित रूग्‍णांच्या संख्येमध्ये वेगाने वाढ होत आहे. अशातच जागतिक आरोग्‍य संघटना (डब्ल्यूएचओ) ची टीम चीनमध्ये जाऊन कोराना विषाणूच्या उत्‍पत्‍तीचा शोध घेणार आहे. कोरोना विषाणूची सुरूवात मागील वर्षी चीनच्या वुहान शहरामधून झाली होती. 

अधिक वाचा : चीनमधील कोरोनाबाबत 'डब्ल्यूएचओ'नं केला मोठा खुलासा

चीनने कोरोना विषाणूची माहिती देण्यास विलंब केला होता. त्‍यामुळे बघता बघता दोन महिन्यातच कोरोनाचा विषाणू जगभर पसरला. त्‍या पार्श्वभूमीवर या विषाणूची उत्‍पत्‍ती कशी झाली याचे मुळ शोधून काढण्यासाठी डब्‍ल्‍यूएचओची टीम पुढील आठवड्यात चीनमध्ये जाणार आहे.

चीनमधील डब्ल्यूएचओ कार्यालयाने 'व्हायरल निमोनिया'च्या प्रकरणांबाबत वुहान महानगर आरोग्य आयोगाच्या विधानानंतर ही तपासणी सहा महिन्यांहून अधिक काळ चालेल. डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ. टेड्रॉस अ‍ॅड्नॉम घेबियस यांनी जानेवारीत चीनबरोबर आंतरराष्ट्रीय तज्ञांची टीम पाठविण्याच्या कराराविषयी चर्चा केली. यामध्ये हा प्रकोप लवकरात लवकर समजून घेण्यासाठी काम करण्याच्या समझोत्‍यासाठी चर्चा केली होती.  

अधिक वाचा : भारतानंतर आता अमेरिकेकडूनही चीनला दणका सुरु!

कोरोना विषाणूमुळे जगभरात पाच लाखापेक्षा अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. तसेच कोरोनाबाधित आणि मृत्‍यूमुखी पडणाऱ्या रूग्‍णांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच आहे. डब्‍ल्‍यूएचओच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्‍या स्‍वामीनाथन यांनी कोराना विषाणूच्या उत्‍पत्‍तीसंबंधी सखोल तपासणी करणे आवश्यकता असल्‍याचे म्‍हटले आहे. 

डब्‍ल्‍यूएचओ या यात्रेमध्ये चीन सरकार सोबत काम करत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले आहे. स्‍वामीनाथन यांनी सांगितले की एक टीम या विषाणूच्या उत्‍पत्‍तीच्या संशोधन तपासासाठी पुढच्या आठवड्यात चीनमध्ये जाणार आहे. त्‍यांनी पुढे बोलताना डिसेंबरच्या आधी या तपासणीमध्ये एक चांगला निष्‍कर्ष समोर येऊ शकतो. त्‍यामध्ये प्राण्यांमधून मनुष्‍यात विषाणू कसा आला या संबंधी माहिती घेतली जाउ शकते असे त्‍यांनी म्‍हटलय. 

अधिक वाचा : चिंताजनक! अमेरिकेत एका दिवसात ५२ हजार रुग्ण

डॉ. स्‍वामीनाथन यांनी म्‍हटलय की चीनी सरकारने ३१ डिसेंबर रोजी वुहान मधून न्युमोनियाच्या प्रकोपाबाबत सूचना दिली होती. स्‍वामीनाथन यांच्या मते कोविड-19 विषाणूचे बॅट व्हायरस म्‍हणजेच वटवाघुळातील विषाणूशी बऱ्याच अंशी साम्‍य आहे. या बाबतीत हा विषाणू कोठून कसा उत्‍पन्न झाला या विषयी आम्‍हाला माहित नसल्‍याचे त्‍यांनी म्‍हटले आहे. 

 "