Sat, Apr 10, 2021 19:32
सीरियावर अमेरिकेचा हवाई हल्ला!

Last Updated: Feb 27 2021 2:34AM

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था

गेल्या आठवड्यात इराकमध्ये अमेरिकन हवाई तळालगत एक रॉकेट हल्ला झाला होता. एका कंत्राटदाराचा त्यात मृत्यू झाला. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी यामुळेच सीरियातील दहशतवादी गटांविरुद्ध हवाई हल्ल्यांना मंजुरी दिली.

राष्ट्राध्यक्षपदाची 20 जानेवारी रोजी शपथ घेतल्यानंतर बायडेन यांनी केलेली ही पहिली लष्करी कारवाई आहे. शुक्रवारी भल्या पहाटे अमेरिकन हवाई दलाने हे हल्ले केले. जेथून दहशतवाद्यांनी अमेरिकन हवाई तळावर रॉकेट हल्ला केला होता, तेथे तसेच दहशतवाद्यांच्या अन्य ठिकाणांवर अमेरिकेने हवाई हल्ले चढविले.

हवाई हल्ल्यांनंतर एका अमेरिकन अधिकार्‍याने सांगितले, ‘सर्व अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. मोठ्या संख्येने दहशतवादी मारले गेले आहेत.’ 

दहशतवादाबाबत कठोरच

ट्रम्प यांच्या तुलनेत बायडेन हे सौम्य आहेत, असे सांगितले जात होते. पण पदग्रहणानंतर लगेचच त्यांनी इराणबद्दलची कठोर भूमिका घेऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

अमेरिकेचे नुकसान करणार्‍या कुणालाही क्षमा केली जाणार नाही.
- जनरल लॉईड ऑस्टिन, संरक्षण मंत्री, अमेरिका

दहशतवाद सहन केला जाणार नाही. बायडेन यांच्या आदेशावरूनच ही कारवाई झाली.- माईक किर्बी, प्रवक्ता, पँटेगॉन, अमेरिका