Sun, Sep 20, 2020 05:35होमपेज › International › अमेरिकेचा चीनला मोठा झटका; 'टिकटॉक', 'वीचॅट'वरील बंदीच्या आदेशावर ट्रम्प यांची स्वाक्षरी 

अमेरिकेचा चीनला मोठा झटका; 'टिकटॉक', 'वीचॅट'वरील बंदीच्या आदेशावर ट्रम्प यांची स्वाक्षरी 

Last Updated: Aug 07 2020 10:10AM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पवॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन

चीन विरोधात अमेरिकेने आक्रमक भूमिका घेतली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉक आणि वीचॅट (VChat) या चिनी ॲप्सवर निर्बंध घालण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. या ॲप्सवर निर्बंध घालण्यासाठी ट्रम्प यांच्या प्रशासनाने १५ सप्टेंबरपर्यंत वेळ मर्यादा निश्चित केली आहे.

वाचा : लडाखमध्ये चीनची घुसखोरी, संरक्षण खात्याच्या वेबसाईटवरील माहिती काही तासांतच डिलीट

ट्रम्प यांनी गुरुवारी रात्री टिकटॉक आणि वीचॅट या ॲप्सवर ४५ दिवसांच्या आत निर्बंघ घालण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली. याआधी सिनेटमध्ये अमेरिकी कर्मचाऱ्यांनी टिकटॉक ॲपचा वापर न करण्याच्या आदेशाला एकमताने मंजुरी दिली होती. चिनी ॲप्सवर निर्बंध घालणे गरजेचे आहे. कारण हे ॲप्स विश्वासार्ह आहेत. टिकटॉकच्या माध्यमातून डेटा एकत्रित करुन देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचवला जाऊ शकतो. ॲप्सच्या माध्यमातून डेटा कलेक्शन करुन चिनी कम्युनिस्ट पार्टीला अमेरिकेतील लोकांची वैयक्तिक माहिती पोहोचवली जाते, असा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.

वाचा : गुगलने चीनचे 2500 यू ट्युब चॅनेल केले डिलिट

अमेरिकेच्या या कारवाईवर अद्याप टिकटॉक आणि वी चॅट ॲप्सच्या मालकांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. भारतानेही आत्तापर्यंत एकूण १०६ अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. सरकारने २७५ चिनी मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी घालण्यासाठी एक यादी तयार केली आहे. या सर्वांवर बंदी घालण्यात येणार आहे. या यादीत टिकटॉक, पबजी आणि जिली यासारख्या अ‍ॅप्सचा समावेश आहे. 

गलवान खोऱ्यात भारत-चीन दरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी भारताने चिनी ॲप्सलवर बंदी घालत चीनला अर्थिक कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.  

वाचा : काश्मीर मुद्द्यावरून पाकची पुन्हा फजिती 

 "