Thu, Jun 24, 2021 12:03
एस्ट्रेझेनका ऑक्सफोर्ड निर्मित लसीचा वापर ब्रिटनने थांबवला; पर्यायी लस देणार

Last Updated: May 07 2021 5:48PM

पुढारी ऑनलाईन डेस्क

ऑक्सफर्ड विद्यापीठ-एस्ट्रेजेनकाने विकसित केलेल्या कोरोना लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होत असल्याचे समोर आले होते. सध्या ही लस ब्रिटनमध्ये सर्वांना दिली जाते, परंतु  ४० वर्षाखालील व्यक्तींना एस्ट्राजेनकाची लस न देण्याचा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. 

वाचा : केंद्र सरकार लशींच्या दोन डोस दरम्यान अंतर वाढवण्याच्या तयारीत!

ही लस घेतल्यानंतर युवकांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याचे प्रमाण वाढले आहे, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. ३० वर्षांपर्यंत वय असलेले आणि कोणत्याही आरोग्य समस्या नसल्यास त्यांना फायजर आणि मॉडर्नाची लस देण्याची सूचना तज्ज्ञांनी केली होती. त्यामुळे ही लस देण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाण्याची अपेक्षा आहे.

जगभरात ही लस घेतलेल्यात प्रत्येकी १० लाख जणांमागे १०.५ जणांच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्याचे  समोर आले आहे. ब्रिटनमध्ये एकूण २४२ जणांच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्याचे समोर आले आहे. 

वाचा : कोरोना : मुलांच्या लसीकरणाबाबतची 'आनंद वार्ता'

एस्ट्राजेनकाच्या लशीमुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होत असल्याच्या कारणास्तव डेन्मार्क लस वापरावर सुरुवातीला स्थगिती दिली होती. त्यानंतर युरोपीयन महासंघातील अनेक देशांनी लस वापर थांबवला होता. तर, काही दिवसांपूर्वीच एस्ट्रेझेनकाच्या लस वापराला डेन्मार्कने कायमस्वरुपी स्थगिती आणली होती.

वाचा : हॉर्वर्ड विद्यापीठाचा भारताला कडक सॅल्यूट!