Wed, Dec 02, 2020 08:12होमपेज › International › नुसतेच लॉकडाऊन कामाचे नाही - WHO

नुसतेच लॉकडाऊन कामाचे नाही - WHO

Last Updated: Mar 26 2020 1:38PM

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस एडनॉम गेब्रियेससजिनिव्हा - पुढारी ऑनलाईन

कोरोनाच्या व्हायरसला घालवण्यासाठी आणि कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी फक्त लॉकडाऊन उपयोगी नसल्याचे जागतिक आरोग्य संघटननेने स्पष्ट केले आहे. सध्या जागतिक पातळीवर अनेक देशांनी लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे लोकसंपर्क कमी झाला आहे. त्याचा उपयोग नवीन कोरोनाग्रस्त निर्मितीमध्ये कमी आणण्यासाठी होत असल्याचे मानण्यात येत आहे. मात्र ही एकमेव गोष्ट कोरोनावर मात करण्यासाठी पुरेशी नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस एडनॉम गेब्रियेसस यांनी सांगितले आहे.

कोरोनाची साथ पूर्णपणे घालवण्यासाठी देशांनी केवळ लॉकडाऊन करुन उपयोग नाही. यामुळे फक्त वेळ काढला जाईल. त्याचा फारसा उपयोग होणार नाही. त्यापेक्षा मोठ्या प्रमाणावर इतर महत्वाची पावले उचलण्याची गरज असल्याचे हूच्या महासंचालकांनी स्पष्ट केले आहे. कोरोनाग्रस्तांचा शोध घेणे, त्यांना अलग करणे, त्यांची चाचणी घेणे, त्यांच्यावर उपचार करणे या गोष्टी अधिक वेगाने करण्याची गरज असल्याचे ते म्हणालेत. सर्वप्रथम आरोग्य सुविधा आणि कर्मचारी वाढवले पाहिजेत. त्यांना योग्य पद्धतीने प्रशिक्षण दिले पाहिजे आणि त्यांची योग्य तिथे नियुक्ती करणे गरजेचे आहे. सामाजिक पातळीवर संशयित शोधण्याची यंत्रणा राबवली पाहिजे. त्याचवेळी चाचणीची सुविधा वाढवली पाहिजे. अलग करुन कोरोनाग्रस्तांवर योग्य उपचार करण्याची सुविधा निर्माण केली पाहिजे. संपर्कात आलेल्यांची योग्य ती क्वारंटाईनची व्यवस्था केली पाहिजे. अशा प्रकारे विविध प्रकारच्या सुनियोजित उपाययोजना केल्या तरच या साथीवर मात करता येईल असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.