Tue, Jul 14, 2020 12:45



होमपेज › International › ट्रम्प यांच्या प्रचाराविरुद्ध दंड थोपटण्याची जबाबदारी भारतीय वंशाच्या महिलेकडे

ट्रम्प यांच्या प्रचाराविरुद्ध दंड थोपटण्याची जबाबदारी भारतीय वंशाच्या महिलेकडे

Last Updated: Jun 30 2020 9:24PM




वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन 

या वर्षी अमेरिकेची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होऊ घातली आहे. डेमोक्रेटिक पक्षाकडून ‘जो बिडेन’ हे मैदानात उतरणार असून त्यांनी रिपब्लिक पक्षाचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. दोन्ही उमेदवारांनी आपला प्रचार सुरु केला आहे. जो बिडन यांनी आपल्या डिजीटल प्रचाराची जबाबदारी भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिक असलेल्या मेधा राज यांच्याकडे सोपवली आहे. त्या आता जो बिडन यांच्या डिजीटल चीफ ऑफ स्टाफ असणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर डिजीटल प्रचार मोहिमेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

मेधा राज यांच्याकडे सगळ्या डिजीटल प्लॅटफॉर्मवर जो बिडेन यांचा प्रभाविपणे प्रचार करणे, प्रचार मोहिमेत समन्वय साधण्याचे काम असणार आहे. राज यांनी लिंक्डइनवर बोलाताना 'मी जो बिडन यांच्या प्रचारात डिजीटल चीफ ऑफ स्टाफ म्हणून सहभागी होणार आहे हे सांगताना आनंद होत आहे. निवडणुकीला १३० दिवस आहेत आणि आम्ही एक मिनिटही वाया जाऊ देणार नाही.' अशी प्रतिक्रिया दिली. राज यांनी यापूर्वी डेमोक्रेटिक पक्षाच्या राष्ट्राअध्यक्षपदाच्या उमेदवार निवडीत पेट बुटीगिएग यांच्या प्रचार मोहिमेत काम केले आहे.

डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार बिडेन यांनी अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर झालेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता डिजीटल प्रचार मोहिमेवर आणि निधी गोळा करण्यावर भर दिला आहे. त्यांच्या डिजीटल चीफ ऑफ स्टाफ असलेल्या मेधा राज यांनी जॉर्जटाऊन विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय राजकारण विषयात पदवी घेतली आहे. तसेच त्यांनी स्टँडफोर्ड विद्यापीठातून एमबीए केले आहे.

यंदाच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ७७ वर्षाच्या जो बिनेट हे ७४ वर्षाचे विद्यामान राष्ट्राध्याक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान देणार आहेत. ३ नोव्हेबर रोजी निवडणूक होणार आहे. नुकत्यात झालेल्या काही जनमत चाचणीनुसार जो विडेन हे डोनाल्ड ट्रम्प पेक्षा ८ पर्सेंटेज पॉईंटने आघाडीवर आहेत.