नवी दिल्ली ः पुढारी ऑनलाईन
ओठात एक आणि पोटात एक, अशी कपटी नियत असणाऱ्या चीनने पुन्हा आपले रंग दाखविले आहेत. चार महिन्यांपूर्वी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील फौजफाटा वाढवायचा की नाही, असा प्रस्ताव चीनला दिला होता. मात्र, त्या प्रस्तावाला बाजूला सारत चीननं सैनिकांची संख्या गुपचूप वाढवली आहे आणि आपली सुरक्षास्थिती बळकट केली आहे, असे वृत्त इंडिया टूडेने दिले आहे.
वाचा ः नगर : शीर नसलेला महिलेचा मृतदेह आढळल्याने शेवगावमध्ये खळबळ
चीननं फौजफाटा वाढविल्यामुळे पुन्हा चीन आणि भारत सीमेवर तणाव वाढण्याची शक्यता आहे. पूर्व लडाख तणाव निर्माण झाला होता, त्यामुळे सप्टेंबरमध्ये दोन्ही देशांनी मिळून एक निवेदन प्रसिद्ध केलेलं होतं. त्यात दोन्ही देशांनी असं म्हटलं होतं की, यापुढे सीमेवरील परिस्थिती आणखी चिघळेल अशी कोणतीही पावलं उचलली जाणार नाहीत. यावर दोन्ही देशांचे एकमत होऊन हे निवेदन प्रसिद्ध केलं होतं.
वाचा ः अनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीची महिलेकडून अमानूष हत्या
लष्कारांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चीननं देपसांगमध्ये आपल्या सैनिकांची संख्या वाढवून आपली स्थिती मजबूत केलेली आहे. दौलत बेग ओल्डीजवळ नव्या जागांवरही चीननं आपल्या सैनिकांची संख्या वाढविली आहे. यामुळे भारतीय सुरक्षा दल सजग झालेले आहे. सद्यस्थितीला सीमेवर दोन्ही बाजूकडून ५०-५० हजार सैनिक तैनात करण्यात आलेले आहेत.