Wed, Sep 23, 2020 09:45होमपेज › International › लेबनॉनची राजधानी बैरुत स्फोटांनी हादरली (video)

लेबनॉनची राजधानी बैरुत स्फोटांनी हादरली (video)

Last Updated: Aug 05 2020 1:29AM
बैरुत : पुढारी ऑनलाईन 

लेबनॉनची राजधानी बैरुत मंगळवारी झालेल्या भीषण बॉम्बस्फोटामुळे हादरून गेली. या स्फोटात अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्फोट इतका भयानक होता की शहरातील अनेक भाग हादरून गेले असून अनेक इमारतींसह घरांची पडझड झाली आहे. 

स्फोटानंतर पडझड झालेल्या ठिकाणांची छायाचित्रे लेबनीज मीडियाने जाहीर केली आहेत. ज्यात काही नागरिक रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसत आहेत. स्फोटाचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. बैरुत शहराच्या बंदर क्षेत्रात झालेल्या स्फोटाचा जोर शहराच्या मोठ्या भागात जाणवला. त्यानंतर काही भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला. 

 "