लेबनॉनमध्ये स्फोट; ७८ जणांचा मृत्यू (Video)

Last Updated: Aug 05 2020 10:51AM
Responsive image


लेबनॉन : पुढारी ऑनलाईन 

लेबनॉनची राजधानी बैरुत मंगळवारी (दि. ४) झालेल्या भीषण महास्फोटात ७८ जणांचा मृत्यू तर ४ हजार लोक जखमी झाले आहेत. रिपोर्टनुसार, येथे एक गोदाम होतं. मागील सहा वर्षांपासून या गोदामात अमोनियम नायट्रेट रसायनाचा साठा होता. या रसायनाचा मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, त्याचा आवाज २४० किलोमीटर दूर सायप्रसपर्यंत ऐकण्यात आला होता. 

लेबनॉनचे पंतप्रधान हसन दियाब यांनी हे खूप धोकादायक गोदाम असल्याचे म्हटले. हे गोदाम २०१४ पासून होतं. या घटनेला जबाबदार असलेल्या लोकांना सोडलं जाणार नाही, असे ते म्हणाले आहेत. 

काय आहे अमोनियम नायट्रेट?

अमोनियम नायट्रेट एक गंधहीन रासायनिक पदार्थ आहे. हे अत्यंत स्फोटक रसायन आहे. आग लागल्यास याचा स्फोट होतो. त्यानंतर विषारी गॅस निघतो.