Fri, Oct 30, 2020 04:09होमपेज › International › भारताविरुद्ध युद्धासाठी चीन ३ वर्षांपासून तयारीत

भारताविरुद्ध युद्धासाठी चीन ३ वर्षांपासून तयारीत

Last Updated: Sep 23 2020 1:32AM
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था

तीन वर्षांपूर्वी 2017 मध्ये डोकलाममध्ये भारतीय आणि चिनी सैन्य समोरासमोर आले होते. भारताने तेव्हाही चीनला अजिबात भीक न घालता कठोर भूमिका घेतली. परिणामी चीनला मागे हटावे लागले होते. यानंतरच्या काळात चीनच्या सामरिक द‍ृष्टिकोनात मोठा बदल झाला. डोकलामनंतरच्या तीन वर्षांत चीनने भारतीय सीमेला लागून असलेल्या आपल्या भागांमध्ये हवाई तळे, हवाई सुरक्षा यंत्रणा आणि हेलिपॅडची संख्या दुपटीवर नेली आहे.

‘स्ट्रॅटफॉर’च्या अद्याप प्रसिद्ध न झालेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. ‘स्ट्रॅटफॉर’ ही एक जागतिक गुप्तहेर संस्था आहे. उपग्रह छायाचित्रांवरून चीनच्या लष्करी पायाभूत सुविधांचे या संस्थेने सविस्तर विश्‍लेषण केले आहे.

लष्करी तळ उभारणीचे अजून बरेच काम पूर्ण व्हायचे आहे. विस्तार आणि लष्करी तळांच्या उभारणींचे काम सुरू आहे. भारताला लागून असलेल्या सीमेवर चिनी सैन्याच्या ज्या हालचाली दिसत आहेत, ती त्यांच्या दीर्घकालीन उद्देशाची सुरुवात आहे, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. सध्या चीन भारतीय सीमेलगत कमीत कमी 13 नव्या तळांची उभारणी करत आहे. 3 हवाई तळ, 5 स्थायी हवाई सुरक्षा यंत्रणा आणि  5 हेलिपॅडचा त्यात समावेश आहे. नव्या हेलिपॅडपैकी चार हेलिपॅडचे काम लडाख वादानंतर सुरू केले आहे, हे विशेष!

 "