Tue, Aug 04, 2020 14:31होमपेज › International › चीनची खुमखुमी वाढली! आता रशियाच्या ‘या’ शहरावर केला दावा

चीनची खुमखुमी वाढली! आता रशियाच्या ‘या’ शहरावर केला दावा

Last Updated: Jul 02 2020 7:47PM
बिजिंग : पुढारी ऑनलाईन 

भारत आणि चीनमध्ये एलएसीवरून तणाव शिगेला पोहोचला आहे. पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात चीनने धोकेबाजी करून २० भारतीय सैनिकांना मारले होते. लडाखमध्ये सीमावाद वाढवत असलेल्या चीनने आता रशियाच्या व्लादिवोस्तोक शहरावर दावा केला आहे. चीनची सरकारी वृत्तवाहिनी सीजीटीएनचे संपादक शेन सिवई यांनी दावा हा केला आहे. त्यांनी ट्विटकरून या नव्या वादाला तोंड फोडले आहे.

अधिक वाचा : थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात अटक वॉरंट; इंटरपोलकडेही मागितली मदत!

सीजीटीएनचे संपादक शेन सिवई यांच्या म्हणण्यानुसार, रशियाचे व्लादिवोस्तोक शहर हे सन १८६० च्या आधी चीनचा हिस्सा होते. या शहराला पूर्वी हॅशेनवाई या नावाने ओळखले जात होते. रशियाने एका तहानुसार हे शहर चीनकडून हिसकावून घेतले, असे मत व्यक्त केले आहे. 

‘सीजीटीएन’च्या संपादकांची टिप्पणी का महत्त्वाची आहे?

चीनध्ये सर्व माध्यम संस्थांवर सरकारी नियंत्रण आहे. एकप्रकारे या माध्यम संस्था सरकारीच असून तेथील संपादक स्तरावरील कर्मचारी हे चीनी कम्युनिस्ट पक्षाच्या आदेशानुसारच आपले मत व्यक्त करत असतात. चीनी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेले राजकीय मत हे तेथील सरकारची विचारसरणी प्रतिबिंबित करते. त्यामुळे ‘सीजीएनटी’ या वृत्तवाहिनीच्या संपादक शेन सिवई यांनी ट्विट करून व्यक्त केलेले मत हे महत्वाचे ठरते. 

अधिक वाचा : ट्रम्प यांच्या प्रचाराविरुद्ध दंड थोपटण्याची जबाबदारी भारतीय वंशाच्या महिलेकडे

पाणबुडी संबंधित गुप्त माहिती चोरल्याचा आरोप...

रशियाने काही दिवसांपूर्वी चीनी गुप्तचर यंत्रणेवर पाणबुडीशी संबंधित गुप्त माहिती चोरल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात रशियाने आपल्याच एका नागरिकाला अटक केली होती. त्यानंतर या नागरिकावर देशद्रोहाचा आरोप लावण्यात आला. संशयीत आरोपी रशियन सरकारमध्ये मोठ्या पदावर कार्यरत होता. ज्याने ही रशियाची गुप्त माहिती चीनला पुरवली होती.

चीनकडून आशियातील ‘या’ देशांना धोका...

आशिया खंडातील चीनच्या विस्तारवादी धोरणांमुळे भारताला सर्वाधिक धोका आहे. याचे थेट उदाहरण लडाखमध्ये चीनी सैन्याने केलेल्य धोकेबाजीने दिले आहे. याशिवाय पूर्व चीन समुद्रात असलेल्या बेटांवर चीन आणि जपानमध्ये तणाव वाढला आहे. काही दिवसांपूर्वीच जपानने चीनी पाणबुडीला पिटाळून लावले होते. 

अधिक वाचा : 'या' सुरक्षा रक्षकाने स्वत: पावसात भिजत श्वानावर धरले छत्र

तैवानलाही चीनने धमकी देत लष्करी बळाचा वापर करण्याची उघडपणे धमकी दिली आहे. या दिवसात चीनी लढाऊ विमानांनी अनेकदा तैवानच्या हवाई क्षेत्राचे उल्लंघन केले आहे. त्याचबरोबर फिलिपिन्स, मलेशिया, इंडोनेशियाबरोबरही चीनचे वाद आहेत.

व्लादिवोस्तोक हा रशियाचा सर्वात मोठा नौदल तळ...

रशियाचे व्लादिवोस्तोक शहर पॅसिफिक महासागरात तैनात असलेल्या नौदलाच्या ताफ्यांचा मुख्य तळ आहे. रशियाच्या ईशान्य भागात वसलेले हे शहर प्रीमोर्स्की क्राई राज्याची राजधानी आहे. हे शहर चीन आणि उत्तर कोरियाच्या सीमेजवळ आहे. व्यावसायिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या व्लादिवोस्तोक हे रशियामधील सर्वात महत्वाचे शहर आहे. रशियामधील बहुतेक व्यापार या बंदरातून होतो. दुसर्‍या महायुद्धात येथे जर्मनी आणि रशियाच्या सैन्यामध्ये मोठे युद्ध झाले होते.

अधिक वाचा : चिंताजनक! अमेरिकेत एका दिवसात ५२ हजार रुग्ण