Mon, Sep 28, 2020 14:57होमपेज › International › #कोरोना : ब्राझीलमध्ये २१ हजारांहून अधिक मृत्यू

#कोरोना : ब्राझीलमध्ये २१ हजारांहून अधिक मृत्यू

Last Updated: May 23 2020 9:36AM
वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन 

आतापर्यंत जगात ५३ लाख ३ हजार ३९३ लोकांना संसर्ग झाला आहे. २१ लाख ५८ हजार ५१० लोक बरे झाले आहेत. मृतांची संख्या ३ लाख ३९ हजार ९९२ वर गेली आहे. 

दरम्यान, ब्राझीलमध्ये कोरोनाने कहर माजवला आहे. ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात २० हजार ८०३ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर, आतापर्यंत १००१ लोकांचा कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला आहे. 

कोरोना संसर्गाच्याबाबतील ब्राझील हा देश आता अमेरिकेनंतर दुस-यास्थानी आहे. येथे एकूण रुग्ण संख्या ३ लाख ३२ हजार ३८२ वर पोहचली आहेत, तर २१ हजारांहून अधिक जणांचे मृत्यू झाले आहेत.

 "