नवी दिल्ली ः पुढारी ऑनलाईन
शुक्रवारी (दि. ५) रोजी युरोपीय वेळेनुसार रात्री ८.१५ वाजता पृष्ठभागापासून १०.४ मिलियम मैल अंतरावरून 'अपोफिस' नावाचा लघुग्रह भ्रमण करत गेला आहे. हे अंतर पृथ्वीपासून चंद्राच्या अंतराच्या ४४ पटीने जास्त होते. हा लघुग्रह पृथ्वीपासून गेला तेव्हा पृथ्वीला त्याचा कोणताही धोका नव्हता. मात्र, पुढच्या वेळी जेव्हा तो पृथ्वीपासून जाईल तेव्हा पृथ्वीला धोका निर्माण होऊ शकतो, असं नासाने स्पष्ट केले आहे.
वाचा ः 'या' अभिनेत्याचं पाचव्यांदा लग्न!, नवी पत्नी ३१ वर्षांनी लहान
अपोफिस हा लघुग्रह आयफेल टाॅवर इतका उंच आहे, त्याची रुंदी ११२० फूट किंवा ३४० मीटर असेल. याचा सरळ सोपा अंदाज असा की, त्याची रुंदी फुटबाॅलच्या साडेतीन मैदानाइतकी आहे. मागील शुक्रवारी हा उपग्रह पृथ्वी जवळून गेला. त्याचा काहीही धोका नव्हता. मात्र, पुढच्या वेळी हा लघुग्रह पृथ्वीजवळून जेव्हा जाईल, तेव्हा मात्र त्याचा जरूर धोका असेल, असं नासानं सांगितलेलं आहे.
वाचा ः कॅगवरही अंकूश? गेल्या सात वर्षात अहवालांची संख्या ५५ वरून २० वर; डिफेन्समध्ये थेट शून्य!
नासाच्या अभ्यासानुसार अपोफिस लघुग्रह १३ एप्रिल २०२९ रोजी पुन्हा एकदा पृथ्वी जवळून जाणार आहे. तेव्हा तो पृथ्वीपासून केवळ १९ हजार मैलांच्या अंतरावरून म्हणजे अगदी जवळून भ्रमण करणार आहे. तेव्हा तो पृथ्वी आणि चंद्र यांच्यामधून भ्रमण करणार आहे. अपोफिस पृथ्वीच्या इतक्या जवळून जाणार आहे की, पृथ्वीभोवती भ्रमण करणाऱ्या स्पेसक्राफ्टच्या कक्षेतूनही जाऊ शकतो, अशाही माहिती नासाने दिलेली आहे.