Mon, Sep 21, 2020 11:16होमपेज › International › तर कुवेतमधील आठ लाख भारतीयांना नोकरी सोडून मायदेशी परतावे लागणार?

तर कुवेतमधील आठ लाख भारतीयांना नोकरी सोडून मायदेशी परतावे लागणार?

Last Updated: Jul 06 2020 11:22AM

संग्रहित छायाचित्रकुवेत सिटी (कुवेत) : पुढारी ऑनलाईन

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभरातील अर्थव्यवस्थांवर अभूतपूर्व परिणाम झाला आहे. विकसित देशांनाही कोरोना महामारीचा जबर फटका बसला आहे. जागतिक बाजारपेठेत खनिज तेलाच्या जोरावर मक्तेदारी राखलेले देशही त्याला अपवाद राहिलेले नाहीत. 

अधिक वाचा : पीएम इम्रान खान यांना तिसऱ्या बायकोवर झालेली टीका झोंबली अन्‌ महिला आमदाराला...

जगभरात तेलाची मागणी कमी झाली आहे आणि म्हणूनच किंमती देखील सातत्याने खाली आल्या आहेत. अशा परिस्थितीत बरेच देश आपली आर्थिक धोरणे बदलू लागले आहेत किंवा नव्याने मांडणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. 

अधिक वाचा : 'त्याबाबत' चीनकडून प्रथमच कबुलीनामा!

कुवेत देखील त्या देशांपैकी एक आहे. तेथील लोकांच्या रोजगाराच्या संधी कमी होऊ नयेत म्हणून कुवेत येथून प्रवासी कामगारांची संख्या कमी करण्यासाठी विधेयक मंजूर करणार आहे. कुवेत टाईम्सच्या वृत्तानुसार, देशाच्या राष्ट्रीय असेंब्लीच्या लीगल आणि लेजिस्लेटिव्ह  समितीने स्थलांतरितांच्या निश्चित कोट्या संदर्भातील मसुद्याच्या नियमांना मान्यता दिली आहे. कायद्याचा मसुदा पाच खासदारांनी सोपविला होता. कुवैत टाईम्सच्या म्हणण्यानुसार आता हे विधेयक संबंधित समितीकडे जाईल. 

अधिक वाचा : पाकिस्तानच्या वाटेवर नेपाळ!

समिती या विधेयकाचा अभ्यास करून कोटा प्रणालीबाबत आपले मत देईल. या विधेयकानुसार कुवेतमधील परदेशी समुदायातील लोकांची संख्या सर्वाधिक आहे. जर हे विधेयक अंमलात आले तर कुवेतच्या एकूण लोकसंख्येच्या १५ टक्केपेक्षा जास्त भारतीय लोक राहू शकणार नाहीत. 

अधिक वाचा : पीएम इम्रान खान यांना त्यांच्याच परराष्ट्र विभागाकडून थेट इशारा!

सध्या १४ लाखांहून अधिक भारतीय कुवेतमध्ये वास्तव्य करतात. हे नवीन विधेयक मंजूर झाल्यास किमान आठ लाख भारतीयांना कुवेतहून परत यावे लागेल. गेल्या महिन्यात कुवेतचे पंतप्रधान शेख सबाह अल-खालिद अल सबाह म्हणाले की, आपण परप्रांतीयांची संख्या 30 टक्क्यांपर्यंत करू जी सध्या 70 टक्के आहे. म्हणजे किमान  २५ लाख परदेशी नागरिकांना कुवेतमधून निघून जावे लागेल.

अधिक वाचा : 'तो' उद्योगपती 'ती' सरकारी नोकरदार, लग्नही गोडीत ठरलं असताना चर्चेत आला पीएम मोदींचा मुद्दा आणि...

 "