नेपाळचा भारतीय मीडियाबाबत सनसनाटी निर्णय!

Last Updated: Jul 11 2020 1:22AM
Responsive image
संग्रहित छायाचित्र


काठमांडू (नेपाळ) : पुढारी ऑनलाईन

नेपाळचा दुरदर्शन सोडून भारतीय मीडियाबाबत सनसनाटी निर्णय घेतला आहे. नेपाळमध्ये डीडी दुरदर्शन सोडून सर्व भारतीय चॅनेल बॅन करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून नेपाळमधील घडामोडींवर भारतीय माध्यमांमध्ये ज्या पद्धतीने वार्तांकन करण्यात आले त्यावरून नेपाळने संताप व्यक्त केला आहे. नेपाळ सरकारचे प्रवक्ते युबा राज खातीवाडा यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली.  

निरर्थक प्रचार भारतीय मीडियातून नेपाळ सरकारविरोधात तसेच आमच्या पंतप्रधानांविरोधात करण्यात येत आहे, त्याने सर्व मर्यांदा ओलांडल्या आहेत, असे माजी उपपंतप्रधान आणि नेपाळ कम्युनिस्ट पार्टीचे प्रवक्ते नारायण काजी श्रेष्ठा यांनी म्हटले आहे. नेपाळी मीडियाने वृत्त दिले आहे. 

दरम्यान, नेपाळी केबल टीव्ही प्रोव्हायडरांकडून मिळालेल्या माहितीनुसार  देशात भारतीय चॅनेलचा सिग्नल बंद झाला आहे. तथापि त्यांच्यापर्यंत कोणताही सरकारी आदेश पोहोचलेला नाही. एएनआय वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.