Thu, Jul 09, 2020 22:10होमपेज › Goa › गोवा : मास्क घाला, अन्यथा १०० रूपये दंड 

गोवा : मास्क घाला, अन्यथा १०० रूपये दंड 

Last Updated: Apr 24 2020 8:42PM

संग्रहित छायाचित्रपणजी : पुढारी वृत्तसेवा 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात  सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान करणे सक्‍तीचे करण्यात आले असून त्याचे उल्‍लंघन करणार्‍यांना १०० रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. हा आदेश सार्वजनिक आरोग्य खात्याच्या अवर सचिव स्वाती दळवी यांनी जारी केला आहे.

त्याचबरोबर दंडाची रक्‍कम न भरुन या आदेशाचं उल्‍लंघन करणार्‍यांना भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ अंतर्गत कारवाई केली जाणार असल्याचेही या आदेशात म्हटले आहे. तर या आदेशाची ताबडतोब अमलबजावणी केली जाणार आहे. 

कोरोनापासून स्वत:चा आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी तसेच कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात २० एप्रिलपासून सार्वजनिक ठिकाणी सर्वांना मास्क वापरणे सक्‍तीचे करण्यात आल्याचा निर्णय सरकारने जाहीर केला होता. त्यानुसार रस्ते, रूग्णालये, कामाच्या ठिकाणी यासह सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे आवश्यक आहे. तसा आदेश सार्वजनिक आरोग्य खात्याकडून जारी करण्यात आला आहे.