Sat, Jul 11, 2020 10:03होमपेज › Goa › पोलिस मुख्यालयातील दोघे कोरोना पॉझिटिव्ह

पोलिस मुख्यालयातील दोघे कोरोना पॉझिटिव्ह

Last Updated: Jul 01 2020 8:04AM
पणजी : पुढारी वृत्तसेवा 

पणजी येथील पोलिस मुख्यालयातील दोन पोलिस कर्मचारी मंगळवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.  पोलिस मुख्यालयात ड्युटी बजावणारे कर्मचारी त्यामुळे सध्या धास्तावले आहेत. या पार्श्वभूमीवर  पोलिस मुख्यालयाचे तातडीने निर्जंतुकीकरण करण्यात आले. 

कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेले दोन्ही पोलिस कर्मचारी हे साखळी येथील आहेत. राज्य गुन्हे नोेंदणी विभागात हे कामाला होते. मात्र काही दिवसांपासून  या दोघांपैकी एक जण रजेवर होता. त्याला ताप व सर्दी झाल्याने त्याने रजा घेतली होती. पोलिस मुख्यालयातील दोन कर्मचारी एकाच वेळी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने, कामानिमित त्यांच्या संपर्कात  आलेले अन्य कर्मचारी धास्तावले असून पोलिस मुख्यालयातील कर्मचारी कोरोना चाचणी करण्यासाठी धाव घेत आहेत. या ठिकाणी अग्नीशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी येऊन  तातडीने निर्जंतुकीकरण केले.

राज्यात मागील काही दिवसांत  कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.   विशेषतः  साखळीत कोरोना रुग्णांची संख्या 20 च्या आसपास पोहचली आहे. त्यामुळे सर्वत्र भीती व्यक्त केली जात आहे. अशातच आता याच भागात राहणार्‍या, पोलिस मुख्यालयात  काम करणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली आहे  पोलिस मुख्यालयत अनेक लोक आपल्या कामानिमित येतात. त्यातच तेथे काम करणारे पोलिस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आल्याने  बाहेरच्या लोकांनी येऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.  पोलिस मुख्यालयात सॅनिटायझरचा वापर वाढवण्यात आला आहे.