Sun, Sep 27, 2020 03:50होमपेज › Goa › नियम मोडणार्‍या बसेसबाबत आता सोशल मीडियावर करा तक्रार

नियम मोडणार्‍या बसेसबाबत आता सोशल मीडियावर करा तक्रार

Published On: Dec 13 2017 1:54AM | Last Updated: Dec 13 2017 12:45AM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या प्रवासी बसेसच्या विरोधात प्रवाशांना तक्रार करता यावी यासाठी वाहतूक पोलिसांनी मंगळवारी खास व्हॉटस्अ‍ॅप क्रमांक जारी केला आहे. प्रवासी  बसेसकडून वाहतूक नियमांचा भंग होत असल्याचे आढळल्यास लोकांनी तात्काळ व्हॉटस्अ‍ॅप क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

वाहतूक पोलिसांकडून तक्रार करण्यासाठी  7875756110 हा व्हॉटस्अ‍ॅप क्रमांक देण्यात आला आहे. भरधाव वेगात बस हाकणे, थांबा नसताना बस थांबवणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसमध्ये भरणे आदी गैरप्रकारांबाबत व्हॉटस्अ‍ॅप क्रमांकावर किंवा गोवा वाहतूक पोलिसांच्या  फेसबूक पेजवर  अथवा ीिीींरषषळलसेरऽसारळश्र.लेा या त्यांच्या संकेतस्थळावरही तक्रार करू शकतात. तक्रार करताना वाहतूक नियमभंग होत असल्याचा फोटो, व्हिडिओ पाठवावा. सदर तक्रारीबाबतची  वेळ, जागा, तारखेचा उल्लेख त्या संदेशात करावा, जेणेकरुन वाहतूक पोलिसांना या  तक्रारीसंदर्भात  योग्य ती कारवाई करणे शक्य होईल, असे वाहतूक पोलिसांकडून कळवण्यात आले आहे. 

प्रवासी वाहतूक करणार्‍या  बसेसकडून नियमांच्या  होणार्‍या उल्लंघनाविरोधात नागरिकांकडून  अनेकदा उघडपणे नाराजी व्यक्त केली जाते.  या  पार्श्‍वभूमीवर बसेसच्या चालक, वाहकांकडून होणार्‍या  वाहतूक नियमभंगाची तक्रार  सोशल मीडियावर व्हॉटस्अ‍ॅपद्वारे करण्याची संधी नागरिकांना  देण्यात आली आहे, असे वाहतूक पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले.