Tue, Aug 11, 2020 21:32होमपेज › Goa › गोवा : दाबोळी विमानतळावर प्रवाशांच्या अ‍ॅंटीबॉडीज टेस्टसाठी मागितली परवानगी 

गोवा : दाबोळी विमानतळावर प्रवाशांच्या अ‍ॅंटीबॉडीज टेस्टसाठी मागितली परवानगी 

Last Updated: May 23 2020 7:11PM

गोव्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणेपणजी (गोवा) : पुढारी वृत्तसेवा 

राज्यात सोमवारपासून देशांतर्गत विमानसेवा सुरु होणार असल्याने या विमानांद्वारे दाबोळी विमानतळावर दाखल होणार्‍या प्रवाशांची अ‍ॅंटीबॉडीज  टेस्टिंग करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडे करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी सांगितले.

लॉकडाऊननंतर राज्यातील दाबोळी विमानतळावर सोमवार 25 मे पासून देशांतर्गत विमानसेवा पुन्हा एकदा सुरु होणार आहे. त्यानुसार सोमवारी 15 देशांतर्गत विमाने दाखल होणार आहेत. 

आरोग्यमंत्री राणे म्हणाले, की लॉकडाऊनचे नियम शिथिल करुन केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने 25 मे पासून देशांतर्गत विमानसेवेस परवानगी दिली आहे. त्यानुसार दाबोळी विमानतळावर यादिवशी बंगळूर, हैदराबाद, दिल्‍ली, मुंबई, म्हैसूर व अन्य शहरांतून सुमारे 15 विमाने दाखल होणार आहेत. या विमानांतून मोठ्या संख्येने प्रवासी दाखल होणार आहेत. त्यामुळे राज्याचे हित लक्षात घेता दिल्‍ली येथील आयसीएमआर तसेच केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडे विमानतळावर प्रवाशांची अँटीबॉडीज टेस्टिंग करण्याची परवानगी मागण्यात आली आहे. या टेस्टिंगनंतर प्रवाशांना कोविड निगेटिव्ह प्रमाणापत्र जारी केले जाईल, असे त्यांनी सांगितले.