Mon, Sep 21, 2020 18:22होमपेज › Goa › गोवा : अन्नासाठी परप्रांतियांच्या मडगावात रांगा

गोवा : अन्नासाठी परप्रांतियांच्या मडगावात रांगा

Last Updated: Mar 26 2020 3:50PM
मडगाव : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या कर्फ्युला पाच दिवसच पूर्ण झाले असून, सरकारकडून धान्य पुरवठा करण्याबाबत अजून कोणतेही प्रयत्न सुरू न झाल्याने लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. सर्वच ठप्प असल्यामुळे अनेक परप्रांतियांवर उपाशी झोपण्याची वेळ आली आहे. सरकारकडून निदान एका वेळेचे जेवण मिळावे या आशेवर गुरुवारी शकडो परप्रांतीय आपल्या मुलांबाळांसह मडगावात जमले होते. त्यांच्यासाठी काही दानशूर व्यक्तींनी घरगुती जेवणाचे पॅकेटस् वितरित करण्याचा प्रयत्न केला. पण जेवणाचे पॅकेटस् अपुरे पडले. यावेळी दीडशेहून अधिक लोक उपस्थित होते आणि पन्नासच पॅकेटस् वाटले गेल्याने जेवण मिळविण्यासाठी लोकांची चाललेली धडपड पाहून पहाणाऱ्यांचे मन हेलावून गेले.

अधिक वाचा : गोव्यात आढळले तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

राज्यात संचारबंदी लागू होऊन गुरुवारी पाच दिवस पूर्ण झाले. दक्षिण गोव्याची बाजारपेठ पूर्ण पणे बंद आहे. काही प्रमाणात दूध उपलब्ध करण्यात आहे. पण, दूध वितरणावर मर्यादा नसल्याने लोक एकाच वेळा दोन तीन दिवसांचे दूध खरेदी करताना दिसून येत आहेत. मडगाव परिसरातील शंभर टक्के दुकाने बंद असून किराणा दुकाने बंद असल्याने अन्नधान्य  मिळणे लोकांसाठी अश्यक्य बनलेले आहे.  तांदूळ, गव्हाचे पीठ आणि डाळ या दैनंदिन जेवणात आवश्यक असलेल्या वस्तूंचा तुडवटा निर्माण झाल्यामुळे लोकांची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे. येत्या २४ तासांत धान्य पुरवठा न झाल्यास घरात चूल पेटू शकणार नाही अशी स्थिती निर्माण झालेली आहे. 

अधिक वाचा : पणजीत लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी

मडगाव शहरात रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांची पाच दिवसांपासून अतिशय वाईट परिस्थिती आहे. कामधंदा नाही आणि जेवणही नाही अशा स्थितीत गुरुवारी सुमारे दीडशे परप्रांतीय मडगावात जमले होते. यातील काही लोकांना बुधवारी काही दानशूर व्यक्तींनी जेवण पुरवले होते. पण, हे अन्न  सरकारकडून मिळाले आहे, अशी भावना झाल्यामुळे गुरुवारी सर्व परप्रांतीय कामगार पुन्हा आपल्या मुलां बाळांसह पुन्हा मडगावात जमले होते.

अधिक वाचा : गोवा डेअरीची आजपासून घरपोच दूध सेवा 

 "