Wed, Jan 20, 2021 22:58होमपेज › Goa › नाताळनंतर पर्यटक परतीच्या वाटेवर

नाताळनंतर पर्यटक परतीच्या वाटेवर

Published On: Dec 28 2017 1:34AM | Last Updated: Dec 28 2017 1:34AM

बुकमार्क करा
बार्देश : प्रतिनिधी

राज्यात नाताळ सण साजरा करण्यासाठी दाखल झालेले पर्यटक परतीच्या वाटेवर आहे. नाताळ सणासाठी परराज्यातील पर्यटक मोठ्या संख्येने बार्देश व पेडणे तालुक्यातील किनार्‍यांवर दाखल झाले होते. उत्तर गोव्यातील मुख्य म्हापसा बाजारपेठेला भेट देऊन पर्यटक परतीच्या वाटेवर असल्याने गेले दोन दोन  दिवस या भागात पर्यटकांची  गर्दी  मोठ्याप्रमाणात होत आहे. बार्देश तालुक्यातील कळंगुट, बागा, कांदोळी, हणजूण, वागातोर तर पेडणे तालुक्यातील मोरजी, हरमल, केरी, आश्‍वे व इतर समुद्र किनारी देशी, विदेशी, स्थानिक पर्यटक नाताळ सण साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने उतरलेले  होते.  यामुळे येथील हॉटेल, टॅक्सी, पायलट, खाद्य पदार्थ  विकणार्‍या व  इतर वस्तू विके्रत्यांना चांगले दिवस आले होते. 

किनारी भागातील परिसरात पर्यटक वस्तू घेण्यासाठी म्हापसा बाजारपेठेत येतात.  अमली पदार्थांच्या व्यवहाराची  खबरदारी घेत  पोलिसांची संशयितांवर करडी नजर होती. याबाबत कळंगुट पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांनी सांगितले, की पोलिसांच्या गुप्त हेर यांच्याकडून अमली पदार्थ विक्री करणार्‍या विके्रत्यांची माहिती मिळताच पोलिस दिवस व रात्रीचे सापळे रचून  संशयितांना अटक करतात. तसेच त्यांच्याकडील मालही जप्त करतात.कळंगुट भागात अशा धरपकड कारवाया सुरू असल्याने संशयितांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

 हणजूण पोलिस स्थानकात गेल्या दोन महिन्यापूर्वी सी.एल. पाटील यांची निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली. त्यामुळे त्यांचीही या भागात अमली पदार्थांचा व्यवसाय करणार्‍या विक्रेत्यांमध्ये भीतीआहे. म्हापसा पोलिस स्थानकाचे निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी सांगितले, की म्हापसा पोलिस स्थानकात सर्वात जास्त गुन्हे नोंद होतात. पण, आपण पोलिस स्थानकाचा ताबा घेतल्यापासून अनेक गुन्हे नियत्रंणात आणण्याचा प्रयत्न केला. म्हापसा पोलिस स्थानकाच्या हद्दीत किनारे नसले तरी गुन्हे फार होतात आपले सहकारी चांगले काम करतात.