Sun, Aug 09, 2020 02:36होमपेज › Goa › न्हावेलीत कार-बस अपघातात महिला ठार

न्हावेलीत कार-बस अपघातात महिला ठार

Last Updated: Oct 09 2019 11:55PM
डिचोली ः प्रतिनिधी 
न्हावेली सुर्ला  मुख्य रस्त्यावरील घोडेश्वरजवळ  बुधवारी सकाळी 10.15 वाजण्याच्या सुमारास कार व प्रवासी बस यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात  नविता सुबोध आमोणकर(37) या  सुर्ला येथील महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता, की कार चक्काचूर झाली. 

डिचोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी  सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास नविता आमोणकर या (जीए-04 सी,0815)या कारने घराकडून साखळी येथे आपल्या दुकानाकडे जात होत्या. यावेळी बेळगाव-मडगाव मार्गावर धावणार्‍या प्रवासी बस (जीए 03 एन 3434)  त्यांच्या कारची समोरासमोर धडक झाली. त्यात कार चक्काचूर होऊन आमोणकर गंभीर जखमी झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी  व स्थानिकांनी त्यांना 108 रुग्णवाहिकेतून साखळी इस्पितळात आणले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.या संदर्भात डिचोली पोलिसांनी पंचनामा केला असून पुढीला  तपास सुरू आहे.

मृत नविता  या सुस्वभावी होत्या, साखळी येथे त्यांचे दुकान होते. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली असून उत्तरीय तपासणीनंतर सायंकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.