Thu, Jul 09, 2020 22:39होमपेज › Goa › 'गोव्यात देखील शिवसेनेची लाट येईल'

'गोव्यात देखील शिवसेनेची लाट येईल'

Last Updated: Nov 27 2019 6:38PM
पणजी : प्रतिनिधी 

महाराष्ट्रात ज्याप्रमाणे शिवसेनेचे सरकार विराजमान झाले त्याचप्रमाणे गोव्यात देखील शिवसेनेची लाट येईल. असा विश्वास शिवसेना गोवा राज्य प्रमुख जितेश कामत यांनी बुधवारी आयोजित पत्रकार  परिषदेत व्यक्‍त केला.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे विराजमान होत असून यासाठी त्यांना शुभेच्छा. तसेच त्यांच्या गुरुवारी होणार्‍या शपथविधीचे थेट प्रक्षेपण म्हापसा येथे केले जाईल असेही त्यांनी सांगितले.

कामत म्हणाले, महाराष्ट्रात शिवसेना युती सरकार स्थापन होत आहे. या सरकार स्थापनेत खासदार संजय राऊत यांची देखील महत्वाची भूमिका आहे. महाराष्ट्रात बहुमत नसताना देखील भाजपकडून सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावरुन भाजपचे दुटप्पी राजकारण समोर आले आहे. भाजपने असे करुन एकप्रकारे जनादेशाचा अपमान केला आहे. गोव्यात देखील भाजपकडून असेच राजकारण करण्यात आले होते अशी टीका त्यांनी केली.