Thu, Aug 13, 2020 17:03होमपेज › Goa › कोरोनामुक्त झालेल्या गोव्यात धोका वाढला; दोघांचा मृत्यू

कोरोनामुक्त झालेल्या गोव्यात धोका वाढला; दोघांचा मृत्यू

Last Updated: Jul 11 2020 12:22PM
पणजी : पुढारी वृत्तसेवा

कोरोनामुक्त झालेल्या गोवा राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा शिरकाव केला असून कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येने २ हजाराचा ठप्पा ओलांडला आहे. तर मृतांच्या आकड्यातही भर पडत चालली असल्याचे चित्र समोर आले आहे. शनिवारी (दि.११) पहाटे कोरोनाबाधित दोन रूग्णांचा मृत्यू झाला असून राज्यात मृतांचा आकडा ११ वर पोहोचला आहे. 

मृत झालेले दोन्ही रूग्ण हे वास्को येथील असून त्यामधील एकाचे वय ८९ इतके आहे तर दुसऱ्याचे वय ३१ आहे. त्यामुळे वास्को येथील कोरोनामुळे बळींची संख्या ६ वर पोहोचली आहे. तर राज्यात आतापर्यंत ११ जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे. 

मृत झालेल्या व्यक्तींवर मडगाव येथील ईएसआय रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची प्रकृती अधिक बिघडत चालल्याने उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. 
गोवा राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा २ हजार २९१ वर पोहोचला असून आतापर्यंत १ हजार २४६ जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्या ८९५ वर उपचार सुरू आहेत.