Wed, Sep 23, 2020 01:27होमपेज › Goa › गोव्यात कोरोनाचे आणखी दोन बळी 

गोव्यात कोरोनाचे आणखी दोन बळी 

Last Updated: Jul 17 2020 1:41AM
पणजी :  पुढारी वृत्तसेवा

राज्यात आणखी दोन कोरोनारुग्णांचा मृत्यू झाला असून  कोरोनाबळींची संख्या 20 वर पोचली आहे. न्यूवाडे - वास्को येथील 55 वर्षीय महिलेचा गुरूवारी सकाळी कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर रात्री 9 वाजता झुवारीनगर - वास्को येथील 67 वर्षीय ज्येष्ठ महिलेचा  कोविड इस्पितळात मृत्यू झाला. या दोन महिलांच्या मृत्यूमुळे मुरगाव तालुक्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 14 झाली आहे. 
राज्यात गुरूवारी कोरोनाचे  नवे 157  रुग्ण आढळले.  

143  रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 1817 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात  गुरूवारी अंजुणा,जुने गोवे, हडफडे, वळवई या भागात प्रथमच कोरोनाने प्रवेश केल्याचे आढळून आले. राज्यातील अ‍ॅक्टिव्ह रूग्णसंख्या 1817वर पोचली असल्याचे आरोग्य खात्याच्या गुरूवारच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.  

राज्यात कोरोनासंबंधी करण्यात आलेल्या चाचणीचा आकडा लाखावर गेला असून  राज्यात गुरूवारपर्यंत 1 लाख 1हजार 554 संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. त्याती 97,900 जणांचा अहवाल खात्याला मिळालेला आहे. कोरोनाच्या चाचणीसाठी गुरूवारी 5812 जणांचे नमुने पाठविण्यात आले. त्यापैकी 2001 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 3654 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी विलगीकरणात ठेवण्यात आलेल्या लोकांची संख्या 189 झाली आहे. 

राज्यभरात  असलेल्या  पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये मांगोरहिल येथील 69, मांगोरहिलशी संबंधित 398, कुडतरी 7, मडगाव 17, केपे 24, लोटली 26, चिंबल 50, नावेली 9, म्हापसा 7, साखळी 34, काम्राभाट-ताळगांव 1, काणकोण 1, फातोर्डा 1, कुडका 1, राय 3, कुंडई 1, वेर्णा 1, मोती डोंगर 7, फोंडा 45, वाळपई 21 व अन्य  रूग्णांचा समावेश आहे. 

राज्यात सर्वाधिक  कोरोना रुग्ण झुवारीनगरमध्ये-170 आहेत. वेर्णा येथील ‘ट्युलीप ’कंपनीत-139, खारेवाडा-104, बायणा-125, सडा-100,  न्यु वाडे-108, चिंबल- 104 आणि बाळ्ळी येथे 42 रुग्ण सापडले असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

 "