Wed, Jan 27, 2021 08:56होमपेज › Goa › पर्यटन मंत्री आजगावकर यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करा : केरकर 

पर्यटन मंत्री आजगावकर यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करा : केरकर 

Last Updated: Oct 17 2019 1:32AM
पणजी : प्रतिनिधी

हक्‍कांसाठी लढा देणार्‍या दृष्टी कंपनीच्या संपकरी जीवरक्षकांना एस्मा लागू करण्याचे विधान करणार्‍या पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांना मंत्रीमंडळातून बडतर्फ करा अशी मागणी प्रदेश काँग्रेस समितीच्या प्रवक्त्या स्वाती केरकर यांनी पत्रकार परिषदेत केली. तर सरकारने या जीवरक्षकांना त्वरीत सरकारी सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी करत गोमंतकीय युवकांवर सरकारने अन्याय करु नये असा इशारा ही त्यांनी यावेळी सरकारला दिला.

यावेळी केरकर म्हणाल्या, थकीत वेतन, नोकरीची नसलेली हमी, तसेच कामाच्या ठिकाणी होणार्‍या छळा विरोधात दृष्टी कंपनीच्या जीवरक्षकांनी संप पुकारला आहे. जीवरक्षकांना काँग्रेसचा पुर्ण पाठींबा आहे. त्यांच्यावर होणार्‍या अन्यायाकडे सरकार डोळेझाक करीत असल्यानेच जनतेसमोर आपली व्यथा मांडण्यासाठी जीवरक्षकांनी हा संप पुकारला असल्याचे त्यांनी सांगितले.