Wed, Sep 23, 2020 03:02होमपेज › Goa › 'कोरोना संकटात गोव्यात इफ्फी कशाला?'

'कोरोना संकटात गोव्यात इफ्फी कशाला?'

Last Updated: Aug 13 2020 5:14PM

संग्रहित छायाचित्रपणजी : पुढारी वृत्तसेवा

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फी २०२० चे आयोजन करण्याचा सरकारने घेतलेल्या निर्णयाचा पुर्नविचार करावा. तसेच इफ्फीमुळे स्थानिक चित्रपट उद्योग तसेच पर्यटनाला कुठला लाभ झाला? यावर त्वरीत श्वेतपत्रिका जारी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी गुरूवारी जारी केलेल्या प्रसिध्दी पत्रकाव्दारे केली आहे. 

गोव्यात कोरोनाने तीन बळी; 480 नवे रुग्ण

कोरोनामुळे गोवा राज्याच्या आर्थिक स्थितीला फटका बसला आहे. महसूलात घट झाली आहे. त्यामुळे सध्याची स्थिती पाहता इफ्फी सारख्या महोत्सवांचे आयोजन करणे योग्य ठरणार नाही. सरकारचा इफ्फीच्या ५१ वा महोत्सवाचे आयोजन करण्याचा निर्णय चुकीचा आहे. त्यामुळे या निर्णयावर सरकारने पुर्नविचार करावा अशी मागणीही त्यांनी केली.

गोव्यात ‘नेटवर्क’चा प्रश्‍न सुटणार!

कोरोनाच्या महामारीत सामान्य जनता आर्थिकदृष्ट्या कठीण परिस्थितीचा सामना करत आहे. गोव्याची अर्थव्यवस्था बरोबर नाही, हे खुद्द मुख्यमंत्र्यानीच मान्य केले असताना, महोत्सवांचे आयोजन करणे व उत्सव साजरे करण्याची ही वेळ नाही. इफ्फी आयोजनात गोवा सरकारची भूमिका केवळ वाहतूक व निवासव्यवस्था सांभाळण्यापुरती मर्यादित राहिली असून, गोवा मनोरंजन संस्थेकडे असलेले महोत्सवातील चित्रपट विभाग हाताळणीचे व इतर सर्व अधिकार केंद्र सरकार व चित्रपट महोत्सव संचालनालयाने काढून घेतले आहेत. गोवा सरकारवर या महोत्सवाच्या आयोजनमुळे मोठा आर्थिक बोजा पडत आहे. मात्र, या इफ्फीचा गोमंतकीय चित्रपट उद्योग तसेच पर्यटनाला काहीच फायदा झाला नसल्याची टीका विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी जारी केलेलया प्रसिध्दी पत्रकाव्दारे केली आहे.

 "