Mon, Aug 03, 2020 15:08होमपेज › Goa › सुजय गस्ती नौका तटरक्षक दलाच्या सेवेत

सुजय गस्ती नौका तटरक्षक दलाच्या सेवेत

Published On: Dec 22 2017 1:43AM | Last Updated: Dec 22 2017 1:42AM

बुकमार्क करा

दाबोळी : वार्ताहर

भारतीय तटरक्षक दलाची ङ्गसुजयफ ही गस्ती नौका आज गोव्यात तटरक्षक दलाचे महासंचालक राजेंद्र सिंह यांच्या हस्ते सेवेत दाखल करण्यात आली. किनार्‍यापासून 105 मीटरपर्यंतच्या गस्तीसाठीच्या 6 नौकांच्या मालिकेतली ही सहावी नौका आहे. अत्याधुनिक साधनांनी ती सज्ज असून, ती स्वदेशी बनावटीची आहे. 

या नौकेद्वारे मुख्यत: पूर्व समुद्री किनारा आणि ओडिशा व पश्‍चिम बंगालच्या सागरी राज्यांना सुरक्षा देण्यात येईल.  गोवा शिपयार्डचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक रिअर अ‍ॅडमिरल शेखर मित्तल तसेच भारतीय तटरक्षक दलाचे महा संचालक राजेंद्र सिंग,एडीजी के नटराजन पश्‍चिम सागरी विभागाचे कमांडर, एस.पी.रायकर, टी.एन.सुधाकर तसेच कमाडंर बी.बी.नागपाल यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

नौदलाने लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी आणि नागरीकांसाठी वास्को येथील खोल समुद्रात गुरूवारी आयएनएस कोच्ची आणि  आयएनएस चेन्नई या दोन युद्धनौकांवर सादर केलेल्या चित्तथरारक कसरतींनी उपस्थित थक्क झाले.

डे अ‍ॅट सी या उपक्रमाअंतर्गत नौदलाची जहाजे सर्वसामान्य लोकांना कशी मदत करतात, रेस्क्यू ऑपरेशन कशी होतात, हेलीकॉप्टर आणि लढाऊ विमाने नौदलाची ताकद कशी वाढवतात याची प्रात्यक्षिके यावेळी उपस्थितांना दाखवण्यात आली.

राज्यपाल मृदुला सिन्हा , पंचायत मंत्री  माविन  गुदिन्हो,  कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे, मुख्य सचिव  धर्मेंद्र  शर्मा, डीजीपी मुक्तेश चंदर आदि  यावेळी  उपस्थित  होते.रियर  अ‍ॅडमिरल पुनीत बहल यांच्या  नेतृत्वाखाली हा उपक्रम पार पडला.