Wed, Aug 12, 2020 02:39होमपेज › Goa › गोवा : 'लॉकडाऊन'मध्ये जीवनाश्यक वस्तू मिळणे झाले कठीण; कोर्टात याचिका 

गोवा : 'लॉकडाऊन'मध्ये जीवनाश्यक वस्तू मिळणे झाले कठीण; कोर्टात याचिका 

Last Updated: Mar 26 2020 6:19PM

मुंबई उच्च न्यायालयाचे गोवा खंडपीठपणजी : पुढारी वृत्तसेवा 

लॉकडाऊन काळात जीवानाश्यक वस्तूंची कमतरता तसेच जीवनाश्यक वस्तू पुरवण्यात सरकारी यंत्रणेला आलेल्या अपयश प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. अभिजीत गोसावी यांनी ही याचिका दाखल केली आहे.  

या लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य जनतेला जीवनाश्यक वस्तू मिळवण्यासाठी मोठे कष्ट करावे लागत आहे. रोजंदारीवरील कामगार तसेच सामान्य जनतेला लागणार्‍या अत्यंत मुलभूत अशा जीवानाश्यक वस्तू देखील मिळणे कठीण झाले आहे. सरकारला या वस्तू लोकांपर्यंत पोहोचवण्यात अपयश आले असून याची दखल घ्यावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवरील पुढील सुनावणी आज गुरुवारी २७ मार्च रोजी दुपारी १२ वाजता घेण्यात आली आहे.

या याचिकेवर न्यायमूर्ती अ‍ॅड. महेश सोनक यांच्यासमोर सुनावणी झाली. सुनावणीवेळी याचिकदार गोसावी यांच्या वतीने अ‍ॅड. रोहीत ब्राज डिसा यांनी तर सरकारच्या वतीने अ‍ॅडव्होकेट जनरल अ‍ॅड. देविदास पांगम यांनी बाजू मांडली. जनतेला कडधान्य तसेच जीवानाश्यक वस्तू पुरवण्यासाठीच्या व्यवस्थेसंदर्भातील कृती आराखडा  सरकारकडून तयार केला जात असून ते लवकरच जाहीर केले जाईल. लोकांना जीवानाश्यक वस्तू मिळाव्यात याची खबरदारी घेतली जात असल्याचे यावेळी अ‍ॅडव्होकेट जनरल अ‍ॅड. देविदास पांगम यांनी सांगितले.