Wed, Sep 23, 2020 01:55होमपेज › Goa › राज्यात कोरोनाचे आणखी तीन बळी

राज्यात कोरोनाचे आणखी तीन बळी

Last Updated: Aug 03 2020 1:29AM
पणजी : पुढारी वृत्तसेवा

राज्यात कोरोनांच्या संख्येत  वाढ होत असून शनिवारी तीन जणांनी आपले प्राण गमावले. यात वेळसांव, बेती व मडगाव येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 48 इतकी झाली आहे. कोरोनामुळे शनिवारी तीन जणांचा मृत्यू झाला. यात आके मडगावातील 64 वर्षीय पुरुष, बेती येथील 77 वर्षीय पुरुष व वेळसांव-कासावली येथील 71 वर्षीय एका महिलेचा मडगावातील कोव्हिड इस्पितळात मृत्यू झाला आहे.

दरम्यान, शनिवारी दिवसभरात  280 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले.  227 कोरोनामुक्त  झाले आहेत. 1707 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असल्याचे आरोग्य सचिव नीला मोहनन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

राज्यात मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. प्रतिदिन सरासरी 150 ते 200 च्या आसपास नवे रुग्ण आढळून येत आहे. मृतांची संख्याही वाढतच आहे. अलीकडच्या दिवसांत सरासरी दोन ते तीन जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागत आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 1700 हून अधिक झाली असून  आतापर्यंत आढळून आलेल्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या 6 हजार पार झाली आहे. यात सर्वाधिक संख्या वास्को येथील कोरोनारुग्णांची आहे. कोरोनाचे नवे रुग्ण आढळून येत असताना कोरोनातून यशस्वीपणे बरे होणार्‍या रुग्णांची संख्यासुद्धा अधिक आहे. कोरोनातून आतापर्यंत 1 हजाराहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.  

कोरोनामुळे मरण आलेल्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे दक्षिण गोव्यातील मडगाव व वास्को येथील आहेत.   राज्यात मागील सव्वा महिन्यात कोरोनाचे 48 बळी गेले आहेत. याशिवाय अनेक जणांवर कोवीड इस्पितळात उपचार सुरू आहेत. महत्वाचे म्हणजे ज्या रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे त्या रुग्णांना अन्य आजार सुध्दा होते.

आरोग्य सचिव नीला मोहनन यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी 1512 नमुने चाचणीसाठी पाठविले होते. त्यापैकी  280 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. इतर नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे. परप्रांतातून रस्तामार्गे आलेल्या 18 जणांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहेत.  58 जणांची कोरोनासंबंधी संशयास्पद लक्षणे आढळून आल्याने त्यांना कोव्हिड इस्पितळात विलगीकरणात ठेवण्यात आल्याचे मोहनन यांनी सांगितले.

दक्षिण गोव्यात वास्को आरोग्य केंद्रात सर्वाधिक 390 रुग्ण आढळलेले असून त्यानंतर कुठ्ठाळीत 334 कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत. मडगावात 110, फोंडा 89, कुडचडे 19, काणकोण 3, बाळ्ळी 48, कासावली 21, चिंचोळणे 2, कुडतरी 43, लोटली 34, मडकई 19, केपे 17, सांगे 6, शिरोडा 11, धारबांदोडा 19, नावेली 31 रुग्ण आढळले आहेत. 

उत्तर गोव्यात चिंबल परिसरात सर्वाधिक 87 कोरोना बाधित रूग्ण आढळले असून त्यानंतर पणजी आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात  80 रूग्ण आढळले आहेत. तसेच डिचोली 6, साखळी 32, पेडणे 15, वाळपई 30, म्हापसा 59, हळदोणा 18, बेतकी 13, कांदोळी 36, कासारवर्णे 6, कोलवाळ 27, खोर्ली 13, शिवोली 17, पर्वरी 34 व मये 5 रूग्ण आढळले आहेत. तसेच रस्ता, विमान व रेल्वे मार्गे आलेले 33 जण कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत.

 "