Tue, Sep 22, 2020 06:05होमपेज › Goa › रायबंदरला होणार सुसज्ज आयुष केंद्र

रायबंदरला होणार सुसज्ज आयुष केंद्र

Last Updated: Feb 29 2020 1:50AM
पणजी : पुढारी वृत्तसेवा

राज्य सरकारने रायबंदर येथील इलीहास येथे जून्या ‘गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’च्या (जीआयएम) मुख्य इमारतीचा संपूर्ण तळ मजला केंद्रीय आयुष मंत्रालयाला दिला आहे. एकुण सुमारे 1600 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या जागेसोबत निवासी क्वार्टरमधली 252 चौमी. जागाही आयुष मंत्रालयाकडे सुपूर्द करण्यात आली आहे. या जागी स्थानिकांच्या आरोग्य तपासणीसाठी आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथीयुक्त आयुष केंद्र खोलले जाणार आहे.  सदर जागा दिल्याबद्दल राज्य सरकारचे केंद्रीय  आयुष (स्वतंत्र प्रभार) तथा संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक यांनी आभार मानले आहे. 

अधिक वाचा : मुस्लिमांना शैक्षणिक संस्थांमध्ये पाच टक्के आरक्षण; सरकार अध्यादेश काढणार!

आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी (आयुष) या पारंपारिक औषध प्रणाली भारताच्या सार्वजनिक आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात.  आपल्या देशातील सार्वजनिक आरोग्यासाठी वाढत असलेला धोका पाहता आयुष प्रणालीला मानवाच्या जीवनशैलीशी संबंधित दीर्घकालीन आरोग्य व्यवस्थापनात अधिक महत्त्व निर्माण झाले असल्याचे नाईक यांनी पाठवलेल्या पत्रकात म्हटले आहे.

 "