Sat, Oct 31, 2020 12:14होमपेज › Goa › राज्यातील ९० टक्के रुग्ण घरी परतले 

राज्यातील ९० टक्के रुग्ण घरी परतले 

Last Updated: Oct 20 2020 1:29AM
पणजी : पुढारी वृत्तसेवा 

राज्यात कोरोनाचा संसर्ग आता कमी होत चालला असून दरदिवशी नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असल्याचे आढळून येत आहे. मागील चोवीस तासात 187 नवे रुग्ण सापडले असून गेल्या चार महिन्यांतील ही नीचांकी संख्या आहे. रविवारी बरे झालेल्या रुग्णांची संख्या 360 आहे. राज्यातील आतापर्यंतची पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 40 हजार 587 झाली असली तरी आतापर्यंत 36 हजार 395 रुग्ण बरे झाले आहेत. ही टक्केवारी 90 टक्के आहे. कोरोना संसर्गामुळे रविवारी  सहा जणांना आपला जीव गमवावा लागल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 3648 झाली असल्याचे आरोग्य खात्याच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.  

कोरोना संसर्गामुळे रविवारी सहा बळी गेले असून यात चार पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बळींचा आकडा 544 झाला आहे. राज्यात  रविवारी मृत झालेल्या सहा कोरोनाबाधित रुग्णांमध्ये बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात सहा आणि मडगावच्या ‘ईएसआय’ इस्पितळात एकाचे मरण झाले. मृत झालेल्यांमध्ये दोघे रुग्ण सिंधुदुर्ग - महाराष्ट्रातील असून ते उपचारासाठी गोमेकॉत दाखल झाले होते. याशिवाय पर्वरी येथील 50 वर्षीय पुरुष, फोंडा येथील 55 वर्षीय महिला, उकशे येथील 65  वर्षीय पुरुष, कांदोळी येथील 67 वर्षीय पुरुष आणि काणकोण येथील 67 वर्षीय महिलेचा समावेश असल्याचे आरोग्य खात्याकडून मिळालेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

 "