Tue, Jul 07, 2020 17:01होमपेज › Goa › मलेरिया, डेंग्यू रुग्ण संख्यावाढीचा धोका

मलेरिया, डेंग्यू रुग्ण संख्यावाढीचा धोका

Published On: Aug 29 2019 9:04AM | Last Updated: Aug 29 2019 9:04AM
पणजी : प्रतिनिधी

राज्यात नुकत्याच उद्भवलेल्या पूर स्थितीमुळे आणि सुमारे 7 ते 10 दिवसांच्या पाणी टंचाईमुळे राज्यात  मलेरिया आणि डेंग्यू रुग्णांत वाढ होण्याचा धोका असल्याचे आरोग्य खात्याच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. 

राज्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांत अचानक वाढ झालेली आढळून आलेली आहे. एरवी पावसाळ्याच्या दिवसात, म्हणजे जून ते  ऑगस्ट या कालावधीत मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णात वाढ होणे हे नियमित आहे. मात्र, यंदा पावसाचा जोर जुलै महिन्यानंतर वाढल्याने  हा कालावधी आता सप्टेंबर महिन्यापर्यंत जाण्याची शक्यता आहे. ठिकठिकाणी पाणी साचत राहिल्याने डासांची पैदास वाढत असल्याने अशा रुग्णात वाढ होणे साहजिक असते. त्यामुळे राज्यात नुकताच जुलै आणि ऑगस्ट महिन्यात मुसळधार पाऊस पडल्याने अनेक शहरी आणि ग्रामीण भागात अनेक दिवस जागोजागी पाणी साचून राहिले होते. या पाण्याचा निचरा वेळेवर आणि व्यवस्थित न झाल्यामुळे रोग पसरवणार्‍या डासांची पैदासही  वाढली होती. याशिवाय, खांडेपार येथे दोन मुख्य जलवाहिन्या फुटल्यामूळे तिसवाडी आणि फोंडा तालुक्यातील आणि सभोवतालच्या भागातही जनतेचे पाण्यासाठी हाल झाले. नळातून पाणी येत नसल्याने लोकांनी वापरात नसलेल्या विहिरी,    पान 2 वर  ओढा, झरीचे पाणी पिण्यासाठी न्यावे लागले होते. शासनातर्फे तसेच खासगी टँकरचा वापर करून अनेकांनी घरातील टाकी, टोप व अन्य भांडीकुंडी पाण्याने भरून ठेवली होते. पाण्याची साठवणूक वाढली होती. पाणी पुरवठा सुरळीत झाल्यानंतर या साठवलेल्या पाण्याचा योग्य  वापर करण्याकडे वा ते पाणी झाकून ठेवण्याकडे दुर्लक्ष होऊन अनेकांकडून नकळतपणे निष्काळजीपणा झाला असण्याची शक्यता आहे. हे साठवणूक केलेले पाणी योग्यप्रकारे झाकून न ठेवल्यास रोगांचा प्रसार करणार्‍या डासांना अंडी घालण्याची चांगली संधी प्राप्त झाली होती. याच ‘एडिस’ डासांची वाढ होऊन आता ते लोकवस्तीकडे मोठ्या प्रमाणात वळण्याचा धोका असल्याचे आरोग्य खात्याच्या सूत्रांनी सांगितले. 

राज्यभरात मागील एका आठवडाभरातच 121 संशयित डेंग्यूच्या रुग्णांची खात्याकडे नोंद झाली आहे. पणजी व आसपासच्या ताळगाव, सांताक्रुज, दोनापावला, सांतइनेज, करझांळ, मिरामार या उपनगरी भागात दररोज दोन ते तीन संशयित डेंग्यूचे रुग्ण सापडत आहेत. मोठ्या सोसायट्यांमध्येही  साठवलेल्या पाण्याच्या टाकीत,प झाडांच्या कुंड्यांमध्येही ‘एडिस’ डासांची पैदास झाली असल्याचे आढळून आले आहे. या सोसायट्यांमध्ये राहणार्‍या लोकांमध्ये व खास करून मुलांमध्ये मलेरिया वा डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला आहे. डासांची वाढ होत असलेल्या या ठिकाणी ‘फॉगिंग’ करण्यात येत असून यामुळे ‘एडिस’ डासांची संख्या कमी झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले.