Tue, Jul 07, 2020 05:20होमपेज › Goa › गोवा : पणजी मनपा मार्केटचे ६ कोटींचे थकीत वीज बिल माफ 

गोवा : पणजी मनपा मार्केटचे ६ कोटींचे थकीत वीज बिल माफ 

Last Updated: Jun 05 2020 5:35PM

पणजी महानगरपालिकेचे मार्केटपणजी : पुढारी वृत्तसेवा 

पणजी महानगरपालिकेच्या नव्या मार्केटचे सुमारे ६ कोटी रुपयांचे थकीत वीज बिल सरकारकडून माफ करण्यात आले आहे. यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच वीज मंत्री निलेश काब्रोल यांचे आभार मानत असल्याची माहिती महापौर उदय मडकईकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. 

पणजीचे नवे मार्केट बांधल्यापासून वीज बिल भरण्यात आले नव्हते. ६ कोटी रुपये इतके बिल भरणे हे मनपाला शक्य नव्हते. त्यामुळे हे वीज बिल माफ करावे अशी मागणी सरकारकडे मनपाकडून करण्यात आले होती. पणजीचे आमदार बाबूश मोनसेरात यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले असल्याचेही त्यांनी सांगितले. 

वाचा : मांगोरहिलमध्ये आणखी 32 जण कोरोना पॉझिटिव्ह

महापौर मडकईकर यावेळी म्हणाले की, सदर वीज बिल भरण्यासाठी मार्केटमधून भाडेस्वरुपात महसूल मनपाला मिळणे आवश्यक होते. मात्र मनपाला हे भाडे मिळत नसल्याने बिलाची रक्‍कम भरणे अशक्य बनले होते. मात्र आता सरकारने हे वीज बिल माफ केले आहे. याशिवाय मार्केटच्या पाण्याचे बिल सुध्दा माफ करावे अशी सरकारकडे मागणी आहे. पाण्याचे बिल न भरल्याने सध्या पाण्याची लाईन कट करण्यात आली आहे. मार्केटमधील दुकानदारांसोबत मनपाकडून नव्याने भाडेकरार केला जाणार आहे. यासाठी भाडेकराराचा मसुदा तयार आहे. मार्केट इमारतीची पूर्ण मालकी मनपाकडे नाही. त्यानुसार या मालकीबाबत मंत्रीमंडळात निर्णय झाला असून याबाबतचा ना हरकत दाखला लवकरच मनपाला सादर केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

वाचा : राज्यात मान्सूनचे आगमन लांबणीवर