Sun, Oct 25, 2020 08:07होमपेज › Goa › विधानसभा अधिवेशनात अर्थसंकल्प, १० विधेयके मंजुरीचा सरकारचा मानस

विधानसभा अधिवेशनात अर्थसंकल्प, १० विधेयके मंजुरीचा सरकारचा मानस

Last Updated: Jul 13 2020 1:42AM
पणजी : पुढारी वृत्तसेवा

गोवा विधानसभेच्या 27 जुलै रोजी होणार्‍या एकदिवसीय पावसाळी अधिवेशनात 2020-21 चा अर्थसंकल्प आणि तब्बल 10 विधेयके मंजूर करण्याचा राज्य सरकारचा मानस असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले.

राज्यातील विरोधी काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पक्षाने अर्थसंकल्प अधिवेशनात मंजूर  करू दिला जाणार नाही, असे जाहीर केले आहे. याआधी, राज्य सरकारने पाच महिन्यांसाठी अनुदानित मागण्या विधानसभेत मंजूर करून घेतल्या होत्या. मात्र, कोरोनाच्या प्रसारामुळे दोन आठवड्यांचे पावसाळी अधिवेशन एका दिवसावर आणले आहे. त्यामुळे विरोधकांना न जुमानता 21 हजार 056 कोटींचा अर्थसंकल्प बहुमताच्या ताकदीवर मंजूर करण्याचे भाजपने निश्चित केले आहे. एका दिवसात अर्थसंकल्प आणि 10विधेयके मांडून ती चर्चा न करता कशी मंजूर केली जाणार याचे सर्वांनाच कोडे पडले आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी अर्थसंकल्पात फेरबदल करण्याची मागणी केली आहे. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी एक दिवसाचे अधिवेशन असल्याने सरकारने अर्थसंकल्पातील अनुदानित मागण्यांवर मतदान घेण्याचे आवाहन केले आहे.

 "