Sun, Aug 09, 2020 11:00होमपेज › Goa › गोव्यात एकोपा, शांती बळकट करावी

गोव्यात एकोपा, शांती बळकट करावी

Published On: Dec 29 2017 1:35AM | Last Updated: Dec 29 2017 12:40AM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

मूलत: शांतताप्रिय असलेल्या गोव्यात ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पना रुजलेली असून सर्वधर्मीयांमध्ये एकोपा आणि शांती अधिक बळकट करावी, असे आवाहन गोव्याचे आर्च बिशप फिलीप नेरी फेर्रांव यांनी आल्तिनो येथील आर्च बिशप हाऊसमध्ये नाताळनिमित्त आयोजित स्नेहमेळाव्यात केले. चर्च संस्था याकामी सरकारला मदत करेल, असेही ते म्हणाले.

सरकार तसेच चर्च संस्था यांच्यावर व्यापक सामाजिक जबाबदार्‍या आहेत. लोक आपल्याकडे मार्गदर्शकाच्या भूमिकेत पाहत असून सरकारकडूनही   उत्तम प्रशासनाची अपेक्षा ठेवतात. अशावेळी जनभावना काय आहेत, ते आपल्याला कळायला हवे आणि आपण काय म्हणतो ते लोकांना समजायला हवे. तरच चांगला समाज घडविणे शक्य आहे. यासाठी सरकार, समाजधुरीण आणि चर्च संस्थांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे  फेर्रांव म्हणाले. गोव्याची निसर्गसंपन्नता आणि शांती सर्वांना आकर्षित करत असल्याने दरवर्षी गोव्यात लाखो पर्यटक येतात.  येथील लोक शांतिप्रिय आहेत.