Fri, Nov 27, 2020 11:25माजी मंत्री रोशन बेग यांना गुंतवणूक घोटाळ्यात अटक 

Last Updated: Nov 25 2020 1:24AM
बंगळूर : पुढारी वृत्तसेवा

आय मॉनेटरी अ‍ॅडव्हायजरी अर्थात आयएमए या नावाने दागिन्यांची कंपनी सुरू करून त्यात लाखो लोकांना गुंतवणूक करण्यास भुरळ घातलेल्या आणि नंतर पैसे बुडवलेल्या प्रकरणात आता माजी मंत्री रोशन बेग यांना अटक झाली आहे. त्यांनी कंपनीचा मुख्य व्यवस्थापकीय संचालक मन्सूर अली खानला मदत केल्याचा संशय आहे. रविवारी सीबीआयने त्यांना अटक केली.

मन्सूर अली सीबीआयच्या अटकेत असून, त्याने बेग यांच्याकडे या घोटाळ्यातील 400 कोटी रुपये असल्याचे जबानीत म्हटले होते. त्यानुसार सीबीआयने रविवारी सकाळी बेग यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. सायंकाळी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. त्यांना परप्पन आग्रहार कारागृहात पाठविण्यात आले आहे.