Tue, Jan 19, 2021 16:37होमपेज › Goa › गोवा : माजी सभापती अनंत शेट यांचे निधन

गोवा : माजी सभापती अनंत शेट यांचे निधन

Last Updated: Aug 03 2020 1:29AM

माजी सभापती अनंत शेटडिचोली : पुढारी वृत्तसेवा

माजी सभापती तसेच मयेचे माजी आमदार अनंत विष्णू शेट (५८) यांचे अल्प आजाराने रविवारी पहाटे ३ च्या सुमारास गोवा वैद्यकीय इस्पितळात निधन झाले. गेले सात दिवस त्यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू होते.

वाचा : नव्या राजभवनाचा प्रस्ताव स्थगित ठेवा 

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सभापती राजेश पाटणेकर, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, उपसभापती मायकल लोबो, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यासह अनेक राजकीय नेते, सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर तसेच शेट यांचे कार्यकर्त्यांनी अंतिमदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. दुपारी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले.

माजी सभापती अनंत शेट यांच्या निधनाने भाजपने अनुभवी नेता गमावला असून, गोव्याच्या राजकारण, समाजकारणात त्यांचे खूप मोठे योगदान आहे. पक्ष मजबूत करण्यातही त्यांनी योगदान दिले. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखत आम्ही सहभागी आहोत, अशा शब्दांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत  यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

वाचा : राज्यात कोरोनाचे आणखी तीन बळी