Sat, Jul 11, 2020 09:19होमपेज › Goa › राज्यात कोरोनाचे ६४ नवे रुग्ण 

राज्यात कोरोनाचे ६४ नवे रुग्ण 

Last Updated: Jul 01 2020 8:04AM
पणजी : पुढारी वृत्तसेवा

राज्यात मंगळवारी 64 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 72 जण बरे झाले आहेत. राज्यात अ‍ॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या  716 झाली असल्याची माहिती आरोग्य खात्याच्या अहवालात  मंगळवारी जाहीर करण्यात आली आहे. 

राज्यात आतापर्यंत एकूण 596 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या तीन आहे. राज्यात आतापर्यंत 1315 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.  रस्ता, रेल्वे आणि विमानमार्गे राज्यात दाखल झालेल्या 107 रुग्णांचा त्यात समावेश आहे. मांगोरहिलमधल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक 255 असून मांगोरहिलशी संबंधित 217 रुग्ण आहेत. राज्यात विविध ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण सापडणे सुरूच असून आतापर्यंत कुडतरी-21,झुवारीनगर-24, आंबेली-23, मडगाव-12,लोटली-11,  केपे-10, चिंबल-10, साखळी-27, नावेली-2 रुग्ण आढळले आहेत.

राज्यात  मंगळवारी  2529 नमुन्यांची चाचणी करण्यात आली असून त्यातील 1794 नमुन्यांचा अहवाल ‘निगेटिव्ह’ आला. अजूनही 671 अहवाल प्रलंबित आहेत. राज्यातील सरकारी विलगीकरणात राहणार्‍या लोकांचा आकडा 347 वर पोचला असल्याचे सूत्रांनी सांगितले.