Mon, Aug 03, 2020 14:42होमपेज › Goa › 'गोव्यातील भाजप सरकारने म्हादई कर्नाटकला विकली'

'गोव्यातील सरकारने म्हादई कर्नाटकला विकली'

Last Updated: Jan 16 2020 1:47AM

पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर पणजी : प्रतिनिधी 

राज्यातील समस्या सोडवण्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत अपयशी ठरले असून त्यांनी गोवा १५ वर्ष मागे नेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी  बुधवारी पत्रकार परिषदेत केली.

वाचा : नाशिक : विंचूरीदळवी शिवारात बिबट्या जेरबंद

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा प्रशासनावर कुठलाच ताबा नसून ते पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. सरकारने म्हादई कर्नाटकला विकली, अशी प्रखर टीका देखील यावेळी त्यांनी  केली.

वाचा : पुणे : अनैतिक संबंधातून पत्नीच्या प्रियकराचा पतीकडून खून

यापुढे गिरीश चोडणकर म्हणाले की, विरोधक राज्याला भेडसावणारे प्रश्‍न उपस्थित करतात. मात्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. जनतेच्या प्रश्‍नांबाबत सरकार असंवेदनशील बनले असून त्याचा काँग्रेस पक्ष निषेध करत आहे. गोवा सरकारमधील मंत्री केवळ पैसे जमवण्यात दंग आहेत. राज्यातील खाण व्यवसाय २०१२ साली बंद झाला. यामुळे जवळपास २.५० लाख कामगार बेरोजगार बनले आहेत.