Tue, Aug 04, 2020 13:50होमपेज › Goa › गोवा : इयत्ता नववी व अकरावीच्या परीक्षा रद्द 

गोवा : इयत्ता नववी व अकरावीच्या परीक्षा रद्द 

Last Updated: Jul 04 2020 1:13AM

संग्रहीत छायाचित्रपणजी : पुढारी वृत्तसेवा  

गोवा राज्यातील इयत्ता नववी व इयत्ता अकरावीच्या  २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी घेतल्या जाणार्‍या पुरवणी परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील परिपत्रक  गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव भागीरथ शेटये  यांनी शुक्रवार ३ जुलै रोजी जारी केले आहे.  

वाचा : अधिवेशनापूर्वी आमदारांनी स्वत: कोरोना चाचणी करावी : सभापती

गोवा शिक्षण मंडळाच्या कार्यक्षेत्रात येणार्‍या राज्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या प्रमुखांना या परिपत्रकाची प्रत पाठवण्यात आली आहे. इयत्ता नववी व इयत्त अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या पुरवणी परीक्षा रद्द करण्यात आल्या असल्याने या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात बढती दिली जाईल. त्यानुसार माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या  प्रमुखांनी याची दखल आवश्यक ती पावले उचलावीत असेही या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. राज्यातील कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. यासंदर्भातील निर्णय काही दिवसांपूर्वी घेण्यात आला होता, तर परिपत्रक ३ जुलै रोजी जारी करण्यात आला आहे.

वाचा : फोंडा स्थानकातील १४ पोलिस पॉझिटिव्ह