Thu, Jul 09, 2020 23:52होमपेज › Goa › राज्यातील सर्व जागा भाजपच जिंकणार : मुख्यमंत्री 

राज्यातील सर्व जागा भाजपच जिंकणार : मुख्यमंत्री 

Published On: May 22 2019 1:36AM | Last Updated: May 22 2019 1:36AM
डिचोली : प्रतिनिधी 

लोकसभा निवडणुकीत उत्तर व दक्षिण गोव्यातील दोन्ही जागा तसेच चारही विधानसभा निवडणुकीतील चारही जागांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी होणार असून  विरोधकांचे सारे  मनसूबे  धुळीला मिळणार आहेत. भाजप सरकार अधिक मजबूत  होणार आहे,असा  विश्वास मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले,की ‘एक्झिट पोल’पाहूनच विरोधक  हवालदिल झालेले असून देशभरात विरोधकांत  खळबळ  माजलेली आहे. निकालाच्या दिवशी भाजपच्या विक्रमी विजयावर पूर्ण शिक्कामोर्तब होणार आहे.

मुख्यमंत्री  म्हणून शपथ घेतल्यानंतर दुसर्‍या दिवसापासून प्रचारासाठी संपूर्ण गोवा पालथा घालून 39 मतदारसंघात 12 ते 14 तास रोज प्रचार केला. विधानसभा पोटनिवडणुकीत चारही मतदारसंघात मुख्यमंत्र्यांनी प्रचारात झोकून दिले होते.   राज्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सर्वच जागा भाजपा जिंकेल,असा त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे 
विरोधकांनी अनेक बाबतीत लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपला घेरण्याचे केलेले प्रयत्न पूर्ण पणे उलथवून टाकण्यात आपल्याला यश आल्याचे सांगून   सर्वच ठिकाणी भाजपाला विजय लाभणार ,असा   विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला आहे.