Sat, Sep 19, 2020 11:24होमपेज › Goa › गोवा राज्यात ६२८ नवे कोरोना बाधित; ४ जणांचा मृत्यू

गोवा राज्यात ६२८ नवे कोरोना बाधित; ४ जणांचा मृत्यू

Last Updated: Sep 18 2020 1:47AM
पणजी :  पुढारी वृत्तसेवा

राज्यात बुधवारी आणखी 4 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून  राज्यातील कोरोना बळींचा आकडा 319 झाला आहे. राज्यात बुधवारी 628  नवे कोरोना  रुग्ण सापडले असून 351 जण बरे झाले आहेत.   राज्यातील एकूण रुग्णसंख्येचा आकडा 26,139 झाला आहे. यातील 20,445 रुग्ण  बरे झाले असून ही टक्केवारी 78 वर पोहोचली आहे.  राज्यभरात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 5,375 असल्याचे आरोग्य खात्याच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

दरम्यान, बुधवारी बळी पडलेले चारही कोरोना रुग्णांचा गोमेकॉमध्ये मृत्यू झाला असून कुंभारजुवे, साखळी, झुवारीनगर आणि पणजीच्या प्रत्येकी एक रुग्णाचा या मृतांमध्ये समावेश आहे. राज्यभरातून 2,066 जणांचे नमुने  बुधवारी  चाचणीसाठी पाठविले असून आतापर्यंत राज्यात 2 लाख 29 हजार 876 चाचण्या घेण्यात आल्या आहेत.     

राज्यात बुधवारी दिवसभरात उत्तर गोव्यात डिचोलीत 248, साखळी 368 , पेडणे 198 , वाळपई 240, म्हापसा 186, पणजी 314, हळदोणे 150, बेेतकी 122 , कांदोळी 169, कासारवर्णे 101, कोलवाळ 103, खोर्ली 138, चिंबल 195, शिवोली 139, पर्वरी 319, मये 62 कोरोनाबाधित रुग्ण आढळले.

दक्षिण गोव्यात  बुधवारी  कुडचडे 88 , काणकोण 77 , मडगाव 428, वास्को 318, बाळ्ळी 30, कासावली 138, चिंचणी 32, कुठ्ठाळी 203, कुडतरी 51, लोटली 114 , मडकई 120, केपे 108, सांगे 78, शिरोडा 44 , धारबांदोडा 104 , फोंडा 306 , नावेली 80 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. 

माजी नगरसेवक धोंड यांचा कोरोनामुळे मृत्यू

पणजीचे माजी नगरसेवक रजनीकांत धोंड (77 वर्ष) यांचा बुधवारी सकाळी कोरोनामुळे मृत्यू झाला. भाटले येथे राहणारे धोंड हे कोरोना पॉझिटिव्ह होते. धोंड हे 1978 ते 1983  या काळात पणजीचे नगरसेवक होते. त्यावेळी महापालिकेचा दर्जा मिळालेला नव्हता. धोंड यांच्या पश्‍चात दोन पुत्र व कन्या असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी सांतइनेज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 

 "