Sat, Oct 31, 2020 12:40होमपेज › Goa › युनियन बँकेचे एटीएम पळवून २० लाखांची रोकड लंपास

युनियन बँकेचे एटीएम पळवून २० लाखांची रोकड लंपास

Last Updated: Oct 20 2020 1:29AM
पर्वरी : पुढारी वृत्तसेवा

आंबिर्णे-सुकुर येथील युनियन बँक ऑफ इंडियाचे  शनिवारी  रात्री उशिरा अज्ञात चोरट्यांनी चक्क एटीएम  मशीनच पळवले आणि त्यातील  19.38 लाख रुपयांची रोकड घेऊन  पोबारा केला. यासंबंधीची तक्रार शाखा व्यवस्थापक प्रभावती हेगडे यांनी पर्वरी पोलिस स्थानकात दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,   आंबिर्णे-सकूर येथील युनियन बँक ऑफ इंडियाच्या (पूर्वीची कार्पोरेशन बँक) सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिस पकडू नयेत, याची दक्षता घेत चोरट्यांनी  सीसीटीव्ही जोडणी तोडून एटीएम कक्षात  प्रवेश केला.  त्यांनी  एटीएम मशीन जागेवरून  काढून तेथून ते निर्जनस्थळी नेेले. या चोरट्यांनी अंदाजे दोनशे मीटर अंतरावर  असलेल्या चर्चच्या मागच्या बाजूच्या  मैदानावर जाऊन ते  मशीन फोडले व आतील सुमारे 19.38 लाख रुपये घेऊन पोबारा केला.   शाखा व्यवस्थापक प्रभावती हेगडे यांनी यासंबंधी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून ठसेतज्ज्ञ, तसेच श्वानपथक घटनास्थळी पाचारण केले. या चोरीच्या प्रकरणात अंदाजे  तीन-चार चोरटे गुंतलेले असू शकतात, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.पोलिस उपनिरीक्षक प्रतीक भट यांनी पंचनामा केला असून पुढील तपास करीत आहेत. 

 "