Tue, Aug 04, 2020 22:49होमपेज › Edudisha › व्हिडीओ ब्लॉगर व्हायचंय?

व्हिडीओ ब्लॉगर व्हायचंय?

Last Updated: Jan 18 2020 1:33AM
विधिषा देशपांडे

व्हिडीओ ब्लॉगिंगचे प्रमाण वाढत चालले आहे. यूजर मंडळी ही वाचन कमी आणि पाहण्यास व ऐकण्यास अधिक पसंती देत आहेत. यूजरची नाडी ओळखून त्यानुसार व्हिडीओ ब्लॉगिंग निर्मितीचे कौशल्य आपल्या अंगी असणे गरजेचे आहे. ब्लॉग निरस वाटू नये, यासाठी मनोरंजन देखील हवे असते.

‘व्हिडीओ ब्लॉगर’चा मार्ग निवडण्यापूर्वी आपल्याला त्याची मूळ संकल्पना लक्षात घेणे गरजेचे आहे. व्हिडीओ ब्लॉगरकडे संपूर्ण जगाचे लक्ष कशामुळे वेधले जात आहे, यामागची कारणे जाणून घ्यायला हवीत. सद्यस्थितीतील इंटरनेटचा वेग पाहता सोशल मीडियात लवचिकता अधिकाधिक पहावयास मिळत आहे. त्यामुळे व्हिडीओ ब्लॉगिंगचे प्रमाण वाढत चालले आहे. यूजर मंडळी ही वाचन कमी आणि पाहण्यास व ऐकण्यास अधिक पसंती देत आहेत. यूजरची नाडी ओळखून त्यानुसार व्हिडीओ ब्लॉगिंग निर्मितीचे कौशल्य आपल्या अंगी असणे गरजेचे आहे. ब्लॉग निरस वाटू नये, यासाठी मनोरंजन देखील हवे असते. त्यामुळे आपणही व्हिडीओ ब्लॉगिंंग करण्यास आणि स्वत:चे चॅनेल सुरू करण्याची तयारी करत असाल, तर काही गोष्टींची पडताळणी करावी लागेल. 

कॅमेरा : हायडेफिनेशनचा कोणताही कॅमेरा हा व्हिडीओ ब्लॉगिंगसाठी उपयुक्‍त ठरू शकतो. आजकाल बहुतांश मोबाईल कॅमेरे हे उच्च दर्जाचे आणि एचडीचे आहेत. त्यामुळे कोणताही व्यक्‍ती आपल्या फोनवर व्हिडीओ तयार करून सुरुवात करू शकतो. मात्र कॅमेर्‍याचा प्रकाश चांगला असावा, एवढीच त्यामागची अट आहे. 

चांगला माईक : व्हिज्युअल कितीही चांगले असेल, मात्र त्याचा आवाज खराब असेल तर आपल्या ब्लॉगकडे कोणीही वळणार नाही. चांगल्या आवाजाअभावी ब्लॉगची मेहनत पाण्यात जाऊ शकते. एखाद्या प्रसंगातून एखाद्याला खराब ऑडियो किंवा खराब व्हिडीओ वगळायचा असेल, तर तो खराब ऑडिओच्या ठिकाणी खराब व्हिडीओची निवड करेल. कारण मोठ्या संख्येने हजर असलेल्या श्रोत्याला आपला आवाज स्पष्टपणे ऐकू येत नसेल तर त्यांचा संयम सुटू शकतो. व्हिडीआ ब्लॉगिंग हा प्रकार पाहण्यापेक्षा ऐकण्यावर अधिक भर देतो. त्यामुळे यासाठी चांगला माईक खरेदी करणे गरजेचे आहे. 
शूटिंगचे वातावरण : व्हिडीओ ब्लॉग तयार करताना वातावरण हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. शूटिंगच्या ठिकाणी गोंगाट, आवाज अजिबात नको. अशावेळी तेथे ब्लॉग तयार करू शकणार नाहीत. चांगली पार्श्‍वभूमी आपल्याला उत्तम व्हिडीओ ब्लॉग तयार करण्यास हातभार लावू शकते. 

संपादन : ऑडिओ आणि व्हिडीओ दुरुस्तीनंतर आपल्याला संपादन करण्याची गरज भासते. संपादनासाठी आपल्याला मूलभूत गोष्टींचे आकलन करणे गरजेचे आहे. माईकसाठी आपण फायनल कट प्रो नावाच्या सॉफ्टवेअरचा वापर करावा. त्याच्या मदतीने चांगले संपादन करू शकतो. 

कंटेट : व्हिडीओ ब्लॉगिंगसाठी विषय, आशय हा महत्त्वाचा गाभा असतो आणि भविष्यातही राहिल. कारण संपूर्ण ब्लॉगच एखाद्या कंटेटवर अवलंबून असतो. जर विषय चांगला नसेल तर आपला व्हिडीओ चांगला होणार नाही आणि त्यात काहीतरी उणिवा राहतील. जर कंटेट चांगला नसेल तर आपण चुकीच्या माहितीच्या आधारे असलेल्या लेखांचे वाचन कराल.

यूट्यूबचा वापर : सध्याच्या काळात यूट्यूब हा सर्वश्रेष्ठ व्हिडीओ ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे. याठिकाणी हजारोंच्या संख्येने दर्शक असतात. यूट्यूब हे सजगत्या वापरण्यात येणारा अ‍ॅप किंवा संकेतस्थळ आहे. या ठिकाणी व्हिडीओ संपादन करण्यासाठी अनेक टूल उपलब्ध आहेत. तेथे आपल्याला ऑडिओ देखील उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे ते कॉपराईटमुक्‍त असतात. जर आपण या क्षेत्रात नवीन असाल तर यूट्युब आपल्याला व्हिडीओे ब्लॉगर होण्यासाठी मदत करु शकते. 

सुरुवातीच्या काळात अडचणी : व्हिडीओ ब्लॉगिंगपासून केवळ पैसे कमावणे हाच उद्देश नसावा. परंतु ब्लॉगमधून पैसे मिळवायचे आहेत, हेदेखील विसरता कामा नये. जोपर्यंत आपला व्हिडीओ सुपर व्हायरल होत नाही, तोपर्यंत आपण पैसे मिळण्याची अपेक्षाच ठेवू नये. व्हिडीओचा चांगला कंटेट हा आपल्या व्हिडीओला दर्शक आणि ग्राहक मिळवून देऊ शकतो. याशिवाय अन्य कोणताही मार्ग नाही. अर्थात, एकदा आपल्याला यूट्यूबवर सबस्क्रिप्शन मिळण्यास सुरुवात झाली की, दर्शकांची संख्या हळूहळू वाढू लागते. या माध्यमातून आपला प्रत्येक नवीन व्हिडीओ दर्शकांपर्यंत सहजपणे पोहचू शकतो.