Mon, Apr 06, 2020 09:54होमपेज › Edudisha › पर्याय  बायोकेमिकल इंजिनिअरिंगचा

पर्याय  बायोकेमिकल इंजिनिअरिंगचा

Last Updated: Feb 25 2020 1:29AM
विजयालक्ष्मी साळवी

जैविक जीव आणि अणूशी संबंधित अभ्यास बायोकेमिकल इंजिनिअरिंगमध्ये केला जातो. त्याचबरोबर रचना आणि उत्पादनाशी निगडित गोष्टींचाही बायोकेमिकलमध्ये अभ्यास होतो. करिअरच्या दृष्टीने बायोकेमिकल इंजिनिअरिंग क्षेत्र उपयुक्त क्षेत्र मानले जात असून, तेथे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. 

बायोकेमिकल इंजिनिअरिंग, रासायनिक इंजिनिअरिंग (केमिकल इंजनिअरिंग) हा जैव रसायन आणि मायक्रोबायोलॉजीतील अंतर्गत विषय अभ्यास आहे. त्याचा प्रमुख उद्देश हा बायोटेक्नॉलॉजी, बायो केमिकल इंजिनिअरिंग, मायक्रोबियल आणि एंजाईम सिस्टीममध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करणे होय. 

बायोकेमिकल्स इंजिनिअरिंगचे विषय

बायोकेमिकल्स इंजिनिअरिंगमध्ये अनेक विषयांचा अभ्यास केला जातो. त्यात बायोकेमिस्ट्री, बायो इंटरप्रेन्योरशिप, ऑर्गेनिक केमिस्ट्री, पॉलिमर इंडस्ट्री, बायोप्रोसेस, बायोप्सी, एन्व्हायरमेंटल बायोटेक्नॉलॉजी, एन्व्हायरमेंटल स्टडी, फर्टिलायझर टेक्नॉलॉजी याशिवाय अन्य काही महत्त्वाच्या विषयांचा बायोकेमिकल इंजिनिअरिंगमध्ये समावेश होतो. या विषयाची माहिती आपण इंटरनेटवर घेऊ शकता.

पदवी अभ्यासक्रमासाठी पात्रता

पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याला फिजिक्स, मॅथ, केमिस्ट्री, बायोलॉजी विषयासह बारावी उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी 50 टक्क्यांपेक्षा अधिक गुण असणे गरजेचे आहे. अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी आपल्याला प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. यासाठी परीक्षा दोन भागात विभागली जाते. एका भागात वैकल्पिक प्रश्न विचारले जातात. त्याचा कालावधी हा तीन तासांचा असतो. तर दुसर्‍या भागात तीन खंडात विभागणी केलेली असते. केमिस्ट्री, मॅथ आणि फिजिक्समध्ये भाग केलेले असतात. 

पदव्युत्तर पदवीसाठी परीक्षा

पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी आपल्याकडे बायोकेमिकल इंजिनिअरिंगची पदवी किंवा बीटेक पदवी असणे गरजेचे आहे. तसेच पीजी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षेत चांगले गुण असणे देखील गरजेचे आहे. त्यानंतर आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएशन अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. प्रवेश परीक्षेचे आयोजन केंद्र, राज्य आणि खासगी महाविद्यालयांकडूनही केले जाते. या परीक्षेत बीटेकच्या अभ्यासक्रमातूनच प्रश्न विचारले जातात. बायोकेमिकल इंजिनिअरिंगमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन अभ्यासक्रम हे देशातील अनेक नामवंत विद्यापीठाकडून  शिकवले जातात. याशिवाय खासगी शैक्षणिक संस्थांकडूनही पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवले जातात. तेथे आपण प्रवेश घेऊन करिअरला दिशा देऊ शकतो. बायोकेमिकल इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवीचे अभ्यासक्रम कोणत्या ठिकाणी शिकवले जातात यासाठी आपण इंटरनेटची मदत घेऊ शकता. या आधारे शैक्षणिक संस्थांचा शोध घेता येईल.